शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

लोकमत टाइम्स कॅम्पस् क्लब नोंदणी

By admin | Updated: August 10, 2014 02:03 IST

लोकमत टाइम्स कॅम्पस् क्लब नोंदणी

नाशिक : लोकमत टाइम्स कॅम्पस् क्लब या विद्यार्थ्यांसाठी हक्काच्या व्यासपीठाच्या वर्ष २०१४-१५ च्या सदस्यता नोंदणीला आजपासून उत्साहात सुरुवात झाली़‘लोकमत’च्या शरणपूर रोडवरील शहर कार्यालयात लोकमतचे सहायक उपाध्यक्ष बी़ बी़ चांडक, श्यामराव विठ्ठल बँकेचे विभागीय व्यवस्थापक बिपीन जोशी, बँकेच्या शरणपूररोड शाखेचे व्यवस्थापक दिनेश कामत, बलई कोशचे संचालक नीलेश छडवेलकर व उपस्थित विद्यार्थी- पालकांच्या हस्ते हवेत फु गे सोडून या नोंदणीचे उद्घाटन करण्यात आले़ आज एकदिवसीय नोंदणी अभियानांतर्गत शहरातील मिनी मॅजिक स्कूल, रिलायन्स पेट्रोलपंपासमोर, मेरी, चाटे रेसिडेन्शिअल कॅम्पस, आडगाव नाका, महात्मा फुले कलादालन, गोविंदनगर, जनता विद्यालय उत्तमनगर, सिडको, श्रीकृष्ण लॉन, काठेगल्ली, राधाकृष्ण मंगल कार्यालय, इंदिरानगर, क्रॉम्प्टन हॉल, सावतानगर, सिडको, वाघ गुरुजी प्राथमिक विद्यालय, गंगापूररोड, इच्छामणी मंगल कार्यालय, उपनगर, डे केअर शाळा, राजीवनगर, छत्रपती शिवाजी हायस्कूल, सातपूर या केंद्रांवर नोंदणी करण्यात आली़ आज उद्घाटन होताच सर्वच केंद्रांवर नोंदणीसाठी विद्यार्थी, तसेच त्यांच्या पालकांनी एकच गर्दी केली होती़ ‘लोकमत टाइम्स कॅम्पस क्लब’ हा इयत्ता पहिली ते नववीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी विशेषत्वाने सुरू केलेला अ‍ॅक्टिव्हिटी क्लब आहे. या मंचाद्वारे बालकांसाठी वैविध्यपूर्ण अशा शैक्षणिक, मनोरंजनात्मक कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे. या मंचासाठी नाव नोंदवल्यावर एक वॉटर बॉटल, ओळखपत्र, ‘यूसीएमएएस’चे सहा दिवसांचे फ्री वर्कशॉप, आय स्क्वेअर आॅप्टिकल्सकडून फ्री आय चेकअप, समीर डान्स इन्स्टिट्यूटकडून सहा दिवसांचे फ्री वर्कशॉप, सिक्स डिग्रीज्कडून फ्री डोनट आॅर योगर्ट, कॅफे क्रेमकडून एक फ्री आइस्क्रीम व झोडिअ‍ॅक लर्निंग सिस्टिमकडून आठ तासांचे इंग्लिश स्पिकिंगचे शिबिर असे अनेक उपहार मुलांना लाभणार आहेत. याशिवाय कॅम्पस् क्लबच्या प्रत्येक सदस्याला श्यामराव विठ्ठल को-आॅपरेटिव्ह बॅँकेकडून (एसव्हीसी) झीरो बॅलन्स फ्री सेव्हिंग अकाउंट व सोबतच एक पिगी बॅँकदेखील मोफत मिळणार आहे. याबरोबरच ‘लोकमत टाइम्स’मध्ये रोज एक कूपन प्रसिद्ध केले जाणार आहे. त्या कूपनमधील प्रश्नाचे अचूक उत्तर बलई कोश या संस्थेच्या वतीने देण्यात येणाऱ्या शीटवर बालगोपाळांनी चिकटवायचे आहे. त्यातील भाग्यवान विजेत्यांना बलई जीनिअस स्कीममध्ये एक लाख रुपयांपर्यंतचे बक्षीस जिंकण्याची संधी मिळणार आहे. हे सगळे लाभ फक्त १५० रुपयांच्या नावनोंदणीवर मिळणार आहेत. (प्रतिनिधी)