शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

लोकमत एनपीएल क्रिकेट महासंग्रामाला शानदार प्रारंभ

By admin | Updated: December 22, 2016 00:50 IST

लोकमत एनपीएल क्रिकेट महासंग्रामाला शानदार प्रारंभ

नाशिक : विलोभनीय लाइट-शोचा झगमगाट, फटाक्यांच्या आतषबाजीने उजळलेला आसमंत, तरुणाईचे बहारदार समूह नृत्य अन् बॅण्ड पथकासह संघांतील खेळाडूंच्या संचलनाने क्रिकेटचा महासंग्राम म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘लोकमत’ एनपीएलच्या सीझन-६चे जल्लोषात उद्घाटन करण्यात आले. राजुरी स्टील प्रस्तुत लोकमत एनपीएल सीझन-६ या क्रिकेट महासंग्रामाला बुधवारपासून हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर मान्यवरांच्या हस्ते आकाशात रंगीबेरंगी फु गे सोडून व ‘लोकमत’चे संस्थापक स्व. जवाहरलालजी दर्डा यांच्या प्रतिमेला अभिवादन करून प्रारंभ झाला. संघमालक व संघातील खेळाडूंचा या सोहळ्यात विशेष सत्कार करून उद्घाटनानंतर या महोत्सवातील पहिला सामना भदाणेज्  हायटेक टायगर्स आणि संदीप फालक न्स या दोन संघात सुरू झाला. याप्रसंगी  महापौर अशोक मुर्तडक, आमदार देवयानी  फरांदे व डॉ.सुधीर तांबे, महानगरपालिकेचे आयुक्त अभिषेक कृष्ण, पोलीस आयुक्त  रवींद्र सिंघल,  नेक्सा मारुती सुझुकीचे विभागीय व्यवस्थापक मोहित जिंदाल, अशोका समुहाचे चेअरमनअशोक कटारिया, फ्रावशी इंटरनॅशनल स्कूलचे संचालक रतन लथ, एक्स्प्रेस इन हॉटेलचे व्यवस्थापक विकास शेलार, बॉशचे टेक्निकल हेड अविनाश चिंतावार, राजुरी स्टीलचे मुख्य वितरक मनू चांदवानी, हेमंत कोठावदे व प्रकाश पटेल, राजेंद्र बागड, सचिन बागड आदि मान्यवर उपस्थित होते.  याप्रसंगी महापौर अशोक मुर्तडक म्हणाले की, ‘लोकमत’ने दर्जेदार बातम्या व त्यामागील विश्लेषण देताना नाशिकच्या तरुणांना क्रिकेटचे व्यासपीठ उपलब्ध करून दिले. नाशिक महानगराचे नाव या स्पर्धेमुळे देशपातळीवर उंचावले आहे. या स्पर्धेतून पुढे प्रगती करणारे खेळाडू देशपातळीवरील विविध मानाच्या स्पर्धा खेळतात. त्यांचा खेळाचा दर्जा बघून हा नाशिकचा खेळाडू म्हणून उल्लेख होऊन लोकमत एनपीएलचे नाव घेतले जाते. यातच लोकमत व नाशिककरांचे यश सामावले असल्याचे ते म्हणाले.  रतन लथ यांनी खेळाडूंना शुभेच्छा देताना लोकमतच्या एनपीएल क्रिकेट महोत्सव आयोजनाचे कौतुक केले. गेल्या सहा वर्षांपासून सतत हा महोत्सव आयोजित करून नाशिकच्या खेळाडूंना देशपातळीवर ‘स्टार’ तयार करण्याचे काम एनपीएल क्रिकेट महोत्सव करीत असल्याचे त्यांनी सांगितले. पोलीस आयुक्त रवींद्र सिंघल म्हणाले , या स्पर्धेनिमित्त नाशिकच्या खेळाडूंना दर्जेदार क्रिकेटचे मैदान उपलब्ध होत असते. खेळाडूंनी वर्षभर मेहनत घेऊन या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या संघात आपले नाव कसे घेतले जाईल, या दृष्टीने प्रयत्न करावा असे आवाहन सिंघल यांनी नाशिकच्या खेळाडूंना केले. प्रारंभी ‘लोकमत’चे सहायक उपाध्यक्ष बी.बी.चांडक यांनी सर्व पाहुण्यांचे स्वागत केले.