शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

लोकमत ‘नाशिकरोड प्रॉपर्टी प्रदर्शनाचा समारोप

By admin | Updated: October 10, 2016 01:05 IST

लोकमत ‘नाशिकरोड प्रॉपर्टी प्रदर्शनाचा समारोप

नाशिक : ‘लोकमत’ तर्फे आयोजित करण्यात आलेल्या ‘नाशिकरोड प्रॉपर्टी शोकेस २०१६’या भव्य प्रॉपर्टी प्रदर्शन सोहळ्यास रविवारी (दि. ९) शेवटच्या दिवशी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. तीन दिवस चाललेल्या या प्रॉपर्टी प्रदर्शनामध्ये नामांकित बांधकाम व्यावसायिकांच्या विविध प्रकल्पांची माहिती एकाच ठिकाणी ‘लोकमत’ने उपलब्ध करून दिल्याने सर्वांनी समाधान व्यक्त केले.नाशिक-पुणे महामार्गावरील शिखरेवाडी समोरील स्टार झोन मॉल, पारपत्र कार्यालयाशेजारी लोकमतने नाशिकरोड आणि शहरातील नामांकित बांधकाम व्यावसायिकांचे ‘लोकमत नाशिक शोकेस - २०१६’ हे भव्य प्रॉपर्टी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. रविवारी प्रदर्शनाचा शेवटचा दिवस असल्याने सकाळपासूनच प्रदर्शनाला भेट देण्यासाठी नागरिक, महिलांनी भेट देण्यासाठी गर्दी केली होती. या प्रदर्शनामध्ये सहभागी बांधकाम व्यावसायिकांनी आपले पूर्ण झालेले, सुरू असलेले आणि लवकरच सुरू होणाऱ्या प्रोजेक्टची माहिती नागरिकांना देण्यात येत होती. प्रदर्शनाला भेट देणाऱ्या नागरिक, महिलांना बांधकाम व्यावसायिकांचे शहरात आणि इतरत्र सुरू असलेल्या प्रोजेक्टची माहिती एकाच छताखाली मिळाल्याने त्यांनी समाधान व्यक्त केले. रविवारच्या सुटीमुळे दुपारपासून प्रदर्शन बघण्यासाठी मोठी गर्दी केली होती. यावेळी अनेकांनी आपल्या घरांचे, दुकानांचे, आॅफिसचे स्वप्न साकार करण्यासाठी बांधकाम व्यावसायिकांकडून माहिती घेतली.प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याने प्रदर्शनाचा कालावधी वाढवावा किंवा लवकरच असे प्रदर्शन भरविण्यात यावे, अशी अपेक्षा सहभागी बांधकाम व्यावसायिक तसेच प्रदर्शनाला भेट देणाऱ्यांकडून व्यक्त करण्यात येत होती. तीन दिवसीय प्रदर्शनाचा रविवारी सायंकाळी मोठ्या उत्साहात समारोप झाला. यावेळी लोकमतकडून प्रदर्शनात सहभागी बांधकाम व्यावसायिकांचा स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. (प्रतिनिधी)