लोहोणेर : परिसरात रात्री ८ वाजेच्या सुमारास पावसाने अचानक हजेरी लावल्याने शेतकरी वर्गाची चांगलीच तारांबळ उडाली. सध्या परिसरात बाजरी व मका पीक कापणी व काढणीचे तसेच जनावरांसाठी चारा गोळा करण्याचे कम सुरू आहे. त्यामुळे अचानक आलेल्या पावसाने शेतकऱ्यांची धावपळ झाली. पावसामुळे हातातोंडाशी आलेला घास हिरावला जातो की काय, या भीतीने शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण पसरले आहे. (वार्ताहर)
लोहोणेरला पावसामुळे शेतकऱ्यांची तारांबळ
By admin | Updated: October 11, 2015 22:01 IST