सटाणा : अतिवृष्टीने तालुक्यात झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी आमदार दीपिका चव्हाण यांनी गटविकास अधिकाऱ्यांसह खातेप्रमुख अधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. मात्र बैठकीकडे अधिकाऱ्यांनी पाठ फिरविल्याने माजी आमदार संजय चव्हाण यांनी गटविकास अधिकाऱ्यांच्या दालनाला टाळे ठोकून संताप व्यक्त केला. अनुपस्थित अधिकाऱ्यावर कारवाई व्हावी यासाठी मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करण्यात येणार असल्याचे चव्हाण यांनी स्पष्ट केले.बैठकीसाठी अनुपस्थित अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी यासाठी दि. २३ रोजी मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करण्यात येईल असे त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान बैठकीकडे खातेप्रमुखांनी पाठ फिरविल्यामुळे माजी आमदार संजय चव्हाण यांनी गटविकास अधिकाऱ्यांच्या दालनाला टाळे ठोकून संताप व्यक्त केला. जोपर्यंत अधिकाऱ्यांवर कारवाई होत नाही तोपर्यंत टाळे उघडले जाणार नाही, असा इशारा चव्हाण यांनी दिला. यावेळी उपसभापती वसंत भामरे, जिल्हा परिषद सदस्य यतीन पगार, जिल्हा परिषद सदस्य पप्पूतात्या बच्छाव, संजय सोनवणे, राकेश सोनवणे, किरण पाटील, वैभव गांगुर्डे, अमोल बच्छाव, संजय पवार, निखिल पवार उपस्थित होते. (वार्ताहर)
दालनाला ठोकले टाळे
By admin | Updated: August 17, 2016 23:52 IST