शहरं
Join us  
Trending Stories
1
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
2
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
4
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
5
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
6
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
7
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
8
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
9
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
10
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
11
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?
12
भाजप नेत्यांना आनंदाच्या उकळ्या, शिंदेसेनेच्या राजकीय ताकदीला वेसण बसण्याची अपेक्षा
13
दोन ठाकरे एकत्र आले, आता पुढे काय होणार..?
14
मुंबई जिंकणे भाजपसाठी आव्हानात्मक ? , उद्धवसेनेचे अर्ध्याहून अधिक नगरसेवक शिंदेसेनेत गेल्यामुळे ताकद कमी झाली
15
सत्तेच्या चाव्या राज ठाकरेंच्या हाती ? शिंदेसेना, उद्धवसेना, भाजप यांना खेळवण्याची मिळू शकते संधी
16
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी
17
दुधात थुंकून, तेच दूध ग्राहकांना द्यायचा; किळसवाणं कृत्य CCTV मध्ये कैद झाल्यानंतर शरीफला अटक!
18
'ज्ञानोबा माऊली तुकाराम'च्या गजरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर 
19
गैर-मुस्लिमांचे धर्मांतरण कराणाऱ्या झांगूर बाबाला अटक, मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवायचा अन्...

स्थानिक स्वराज्य संस्था स्वबळावर

By admin | Updated: August 5, 2016 23:58 IST

भाजपाचा नारा : कार्यकर्त्यांच्या बैठकीत मार्गदर्शनं

 सिन्नर : भारतीय जनता पार्टी आगामी नगरपालिका, जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका स्वबळावर लढवेल व सिन्नरचे सर्वाधिकार माजी आमदार माणिकराव कोकाटे यांना राहतील, अशी घोषणा भाजपाचे जिल्हाध्यक्ष दादासाहेब जाधव यांनी केली.नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाने शहर व तालुका कार्यकारिणीची आढावा बैठक माजी आमदार कोकाटे यांच्या संपर्क कार्यालयात आयोजित केली होती. आगामी पालिका निवडणूक पक्षाने स्वबळावर लढवावी, असा आग्रह पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी धरला. कार्यकर्त्यांचे मत जाणून घेतल्यानंतर जाधव यांनी आपल्या भाषणात सदर घोषणा केली. माजी आमदार माणिकराव कोकाटे, भाजपाचे सरचिटणीस सचिन ठाकरे, बापू पाटील, भाजपाचे तालुकाध्यक्ष सुनील केकाण यांच्यासह मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. गेल्या पाच वर्षात कोकाटे यांच्या नेतृत्वाखाली पालिका पदाधिकाऱ्यांनी अनेक विकासकामे केली. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत नक्कीच यश मिळले, असा आशावाद जाधव यांनी व्यक्त केला. पालिका निवडणुकीत उमेदवारी देताना कार्यक्षम कार्यकर्त्यांचा विचार केला जाईल व कार्यकर्त्यांना विश्वासात घेतले जाई असे ते म्हणाले. सिन्नरच्या विकासासाठी मुख्यमंत्री व पालक मंत्र्यांचे सहकार्य मिळत असल्याचे माजी आमदार कोकाटे यांनी सांगितले. सुमारे ८० कोटी रुपयांच्या पाणीयोजनेमुळे सिन्नरचा पाणीप्रश्न मार्गी लागणार असल्याचे कोकाटे म्हणाले. गेल्या दोन वर्षांपासून आपण आमदार नसतांनाही भाजपाच्या नेत्यांमुळे अनेक विकास-कामे आपण मार्गी लावल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी नगराध्यक्ष आश्विनी देशमुख, उपनगराध्यक्ष संजय नवसे, विठ्ठल उगले, सिंधूताई गोजरे, पद्माकर गुजराथी, गंगाधर वरंदळ, नगरसेवक नामदेव लोंढे, बापू गोजरे, मल्लू पाबळे, हर्षद देशमुख, सुजाता गाढे, उज्ज्वला खालकर, राजश्री कपोते, डॉ. प्रतिभा गारे, लता हिले, लता मुंढे, शीतल कानडी, मंगला जाधव, शहराध्यक्ष पंकज जाधव, सविता कोठूरकर, मंगल गोसावी, रामनाथ डावरे, बाळासाहेब हांडे, राजेंद्र कपोते यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. (वार्ताहर)