शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांवरील कर्ज सरकारचेच पाप

By admin | Updated: May 20, 2017 02:25 IST

नाशिक : स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करण्याचे आश्वासन मोदी सरकारने तीन वर्षांत पाळले नाही म्हणून शेतकऱ्यांवर कर्जमुक्ती मागण्याची वेळ आली

 लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करण्याचे आश्वासन मोदी सरकारने तीन वर्षांत पाळले नाही म्हणून शेतकऱ्यांवर कर्जमुक्ती मागण्याची वेळ आली. शेतकऱ्यांच्या डोक्यावरील कर्ज हे सरकारचेच पाप असल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष व खासदार राजू शेट्टी यांनी शिवसेनेच्या वतीने आयोजित कृषी अधिवेशनात बोलताना केला. कृषी अधिवेशनात राजू शेट्टी यांनी केंद्र व राज्य सरकारवर टीकास्त्र सोडले. शेट्टी यांनी आपल्या भाषणाच्या सुरुवातीलाच मी शेतकऱ्यांचीच भाषा बोलणार, त्यासाठी कुणाच्या परवानगीची गरज नसल्याचे स्पष्ट केले. शेतकऱ्याला कर्जमुक्तीची मागणी करण्याची वेळ का आली, याच्या मुळाशी जाण्याची गरज असल्याचे सांगत शेट्टी म्हणाले, शेतकरी कायम देण्याच्या भूमिकेत राहिला आहे परंतु आज त्याच्यावर भीक मागण्याची वेळ आली आहे. नाशिक जिल्ह्यातच गेल्या दहा दिवसांत चार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. आत्महत्यांचे लोण आता पश्चिम महाराष्ट्रातही जाऊन पोहोचले आहे. सरकारचे धोरण हे शेतकऱ्याचे मरण बनले आहे. २०१४ मध्ये लोकसभा निवडणुकीत गोपीनाथ मुंडे यांच्या मध्यस्थीने आम्ही एनडीएसोबत राहिलो. त्यावेळी स्वामीनाथन आयोगाच्या सूत्रानुसार उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव बांधून देण्याचे आश्वासन भाजपाने दिले होते. परंतु, तीन वर्षांत मोदी सरकारने हे आश्वासन पाळले नाही म्हणून शेतकऱ्यांवर कर्जमुक्तीची मागणी करण्याची वेळ आली आहे. २०१९ला होणारी लोकसभेची निवडणूक दूर नसल्याचा इशाराही शेट्टी यांनी यावेळी दिला. भाजपा वाल्याचा वाल्मिकी करायला निघाला आहे परंतु एवढ्या वाल्मिकींची महाराष्ट्राला गरज नाही, अशी टीका करताना शेट्टी यांनी सांगितले, मुख्यमंत्री शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याची भाषा करत आहेत परंतु, मागील वर्षी तुरीला ११ हजार रुपये भाव असताना यावर्षी केवळ ४ हजार रुपये भाव देण्यात आला. सोयाबीनचाही ७ हजारावरून अडीच हजारांवर भाव आला. याच सरकारी धोरणांमुळे शेतकऱ्यांचे साडेअकरा लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांची अशी थट्टा खपवून घेतली जाणार नाही. शेतकऱ्यांना अगोदर समृद्ध करा मग समृद्धी महामार्ग काढत विकासाचे मनोरे बांधा. कर्जमुक्ती हा शाश्वत उपाय नाही परंतु शेतकरी अत्यवस्थ झालेला आहे. शेतकऱ्याला उभा करायचा असेल तर त्याला कर्जमुक्तीची सलाइन दिली पाहिजे आणि उपचार म्हणून स्वामीनाथन आयोगाच्या सूत्राची अंमलबजावणी केली पाहिजे. सरकारने शेतकऱ्यांचा संप मोडून काढण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला दिलेल्या खुर्च्याही काढून घेण्याची ताकद शेतकऱ्यांच्या मनगटात असल्याचे शेट्टी यांनी ठणकावून सांगितले. दरम्यान, येत्या २२ मे पासून पुणे येथील महात्मा फुले यांच्या वाड्यापासून मुंबईपर्यंत आत्मक्लेश पदयात्रा काढण्यात येणार असून सेनेने साथ द्यावी, असे आवाहनही शेट्टी यांनी केले.