शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

कर्जमाफीचे जिल्हा बँकेला दीड हजार कोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2017 01:19 IST

राज्य शासनाने दीड लाखाच्या आतील व दीड लाखापर्यंतच्या शेतकरी कर्जदारांना दिलेल्या कर्जमाफीचा लाभ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेचे थकबाकीदार असलेल्या १ लाख २४ हजार ३०८ शेतकरी सभासदांना होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. तसेच या सव्वा लाख शेतकºयांचे १५०२ कोटी रुपयेही जिल्हा बॅँकेला शासनाकडून प्राप्त होणार आहे.

नाशिक : राज्य शासनाने दीड लाखाच्या आतील व दीड लाखापर्यंतच्या शेतकरी कर्जदारांना दिलेल्या कर्जमाफीचा लाभ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेचे थकबाकीदार असलेल्या १ लाख २४ हजार ३०८ शेतकरी सभासदांना होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. तसेच या सव्वा लाख शेतकºयांचे १५०२ कोटी रुपयेही जिल्हा बॅँकेला शासनाकडून प्राप्त होणार आहे. शासनाने नुकतीच दीड लाखाच्या आत ३० जून २०१६ अखेर थकबाकीदार असलेल्या सभासदांना संपूर्ण कर्जमाफी जाहीर केली. त्यानुसार बॅँकेकडून दीड लाखापर्यंत कर्ज घेतलेल्या ३० जून २०१६ अखेर थकबाकीदार असलेल्या ९० हजार ९३१ शेतकºयांची संपूर्ण कर्जमाफी मिळणार आहे.या ९० हजार ९३१ शेतकºयांच्या कर्जमाफीपोटीची रक्कम ६८६ कोटी रूपये जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेत जमा होणार आहे. तसेच दीड लाखांपेक्षा जास्त मात्र दीड लाखापर्यंत कर्जमाफीच्या लाभास पात्र असलेल्या ३३ हजार ३७७ शेतकºयांचे ८१६ कोटी रुपयेही जिल्हा बॅँकेत जमा होणार आहे. मात्र त्यासाठी या ३३ हजार ३७७ शेतकºयांना त्यांच्याकडील दीड लाखांपुढील कर्जाची थकबाकीची रक्कम सुमारे ३१६ कोटी रुपये आधी जिल्हा बॅँकेत जमा करावे लागणार आहेत. त्यानंतरच त्यांना कर्जमाफीची ५०० कोटींची रक्कम मिळणार आहे. जिल्हा बॅँकेकडील दीड लाखांच्या आतील ९० हजार ९३१ शेतकरी व दीड लाखांच्या पुढील मात्र दीड लाखांपर्यंतच्या कर्जमाफीच्या लाभास पात्र असलेले ३३ हजार ३७७ शेतकरी असे एकूण १ लाख २४ हजार ३०८ शेतकºयांना एकूण दीड लाखांपर्यंतची सुमारे १५०२ कोटी रुपयांची कर्जमाफी मिळणार आहे. आॅक्टोबर २०१७ पासून ही कर्जमाफीची रक्कम राज्य शासनाकडून जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेत जमा होण्यास सुरुवात होणार आहे. कर्जमाफीची एकरकमी रक्कम जिल्हा बॅँकेला मिळणार असल्याने जिल्हा बॅँकेच्या आर्थिक स्थिरतेला बळ मिळणार आहे.‘दीड लाखांच्या पुढे थकबाकीदार असलेल्या मात्र दीड लाखांपर्यंतची कर्जमाफीस पात्र असलेल्या ३३ हजार ३७७ शेतकºयांनी त्यांच्या कर्जमाफीसाठी त्यांची दीड लाखांपुढील सुमारे ३१६ कोटींची रक्कम आधी जिल्हा बॅँकेत जमा करणे गरजेचे आहे. त्यानंतरच त्यांना दीड लाखांपर्यंतच्या सुमारे ५०० कोटींच्या कर्जमाफी रकमेचा लाभ मिळेल. त्यासाठी शेतकरी बांधवांनी त्यांच्याकडील दीड लाखांपुढील रक्कम तातडीने भरावी.’- राजेंद्र बकाल, कार्यकारी संचालक, जिल्हा बॅँक.