शहरं
Join us  
Trending Stories
1
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
2
काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसण्याची चिन्हे
3
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
4
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
5
Gold price outlook: जागतिक तणाव झाला कमी, सोन्याच्या दरात होणार मोठी घसरण? एक्सपर्ट म्हणाले...
6
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ
7
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
8
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
9
अरे देवा! जीवघेण्या धबधब्याच्या काठावर 'ती' बनवत होती 'रील', थरकाप उडवणारा Video Viral
10
"मटण खाणारे पण वारीला आले" म्हणणाऱ्यांना DPने सुनावलं, म्हणाला- "हो मी मटण खातो पण..."
11
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
12
भारताला दिलासा! मित्र देश पाकिस्तानलाच चीननं दिला मोठा झटका; शहबाज शरीफांचं टेन्शन वाढले
13
ठाकरे बंधूंच्या मोर्चात राष्ट्रवादी अजित पवार गट सहभागी होणार का? सुनील तटकरेंचे सूचक विधान
14
पत्नी म्हणाली "अंगाला हात लावू देणार नाही", चिडलेल्या पतीने व्हिडीओ सुरू केला, गळ्यावर पाय ठेवला अन्... 
15
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
16
केदारनाथ येथील हेलिकॉप्टर अपघातात पायलट मुलाचा मृत्यू, पुत्रवियोगाने दु:खी आईने १३ दिवसांनी सोडले प्राण  
17
Aadhaar Card वर तुम्ही मोबाइल नंबर ऑनलाइन बदलू शकता का? काय आहे सर्वात सोपी प्रोसेस, पाहा
18
पाकिस्तानात मोठा आत्मघातकी हल्ला; स्फोटात १३ जवान ठार तर २० हून अधिक गंभीर जखमी
19
₹५००० ची सामान्य एसआयपी की स्टेप अप SIP; कोणती पद्धत लवकर बनवू शकते श्रीमंत? पाहा नफ्याचं गणित
20
'लेडी सेहवाग'च्या 'कमबॅक'मध्ये सचिन तेंडुलकरचा हात! जाणून घ्या त्यामागची स्टोरी

दफनभूमीतील जिवंत इतिहास...

By admin | Updated: January 21, 2017 00:16 IST

ख्रिस्ती कब्रस्तान : जिल्हाधिकारी जॅक्सनसह विविध अधिकाऱ्यांच्या कबरी देतात साक्ष

अझहर शेख : नाशिककब्रस्तान अर्थात दफनभूमी म्हटली की तेथे कबरींव्यतिरिक्त दुसरे असणार तरी काय? शहरातील सारडा सर्कल भागात असलेल्या ख्रिस्ती दफनभूमीमध्येदेखील शेकडो कबरी आहेत. ही दफनभूमी ऐतिहासिक असून इसवी सन १८०० पासूनच्या विविध कबरी या ठिकाणी आहेत. दफनभूमीत फेरफटका मारताना कबरींभोवती जिवंत इतिहास दडलेला आढळून येतो.शहरातील एकमेव ख्रिस्ती दफनभूमी सारडा सर्कल येथील जिल्हा उपनिबंधक कार्यालयाच्या समोर आहे. या दफनभूमीमध्ये प्रवेश करताच पांढऱ्या संगमरवरी दगडात आकर्षक पद्धतीने बांधलेली लेप्रसी निर्मूलन मिशनच्या रोसाली हार्वे यांची १९३२ सालातली कबर नजरेस पडते. जणू ही कबर ख्रिस्ती धर्मीयांच्या आरोग्यसेवेची साक्षच देत आहे. उजव्याबाजूच्या पायवाटेने पुढे गेल्यास काळ्याभोर दगडामध्ये भक्कम बांधकाम असलेल्या पुरातन कबरी बघून नागरिक थक्क होतात. कब्रस्तानाच्या या उजव्या कोपऱ्यात ब्रिटिश राजवटीमधील भारतीय प्रशासकीय सेवेत असलेले विविध अधिकाऱ्यांच्या कबरी येथे पहावयास मिळतात. प्रत्येक कबरीवर इंग्रजीमध्ये दगडी बांधकामात संगमरवरी माहितीफलकही बसविण्यात आला आहे. यावरून कबर कोणाची आहे व त्याचे निधन कधी झाले तसेच तो कुठल्या सेवेत होता आदि प्रकारची माहिती सहज उपलब्ध होते. काळानुरूप काही कबरींची थोड्याफार प्रमाणात पडझड झाली आहे.स्वातंत्र्यचळवळीचे नाशिक हे अत्यंत महत्त्वाचे केंद्र राहिले आहे. स्वातंत्र्यचळवळीच्या इतिहासात नाशिकसोबत विविध घटनांच्या संदर्भ आढळून येतो त्यामध्ये येथील विजयानंद चित्रपटगृहात २१ डिसेंबर १९०९ साली हुतात्मा अनंत कान्हेरे यांनी तत्कालीन जिल्हाधिकारी आॅर्थर मेसन तिप्पेटस् जॅक्सन यांच्या गोळ्या झाडून हत्त्या केली होती. जॅक्सन यांची कबरदेखील या दफनभूमीत आहे. ख्रिस्ती दफनभूमीचा विविध मूलभूत समस्यांसाठी अद्याप संघर्ष सुरूच आहे. या ठिकाणी येणाऱ्या मयताच्या नातेवाइकांना निवाराशेडदेखील उपलब्ध होऊ शकलेले नाही. तसेच चॅपल उभारणीचे काम दीडवर्षांपूर्वी हातात घेतले गेले; मात्र अजूनही ते पूर्णत्वास येऊ शकलेले नाही. सध्या चॅपलचे काम ठप्प आहे. येथील पुरातन कबरींची होणारी पडझडदेखील संबंधितांकडून रोखली जात नाही. पुरातत्व विभागाच्या अखत्यारितीमधील हा विषय नसल्याने तेदेखील या ऐतिहासिक कबरींचे संवर्धन रोखण्यासाठी पावले उचलू शकत नाही.