शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

जीवनगाणे गातच राहावे...

By sandeep.bhalerao | Updated: September 10, 2018 18:33 IST

शर्वाणीच्या आवाजातील जादूलहानपणी एक सुरात गाणे म्हणणारी शर्वाणी आयुष्यात गाण्यातूनच नवी ओळख निर्माण करेल, असे वाटले नव्हते; परंतु आता तिच्या गाण्यातील प्रगती पाहता ती ध्येयाकडे नक्कीच पोहचेल, असे एकूणच तिचे व्यक्तिमत्त्व आकार घेत आहे. प्रत्येकाच्या आयुष्यात चढउतार हे येतच असतात; परंतु नैसर्गिकरीत्या ज्यांच्या नशिबी अपंगत्व येते त्यांच्यासाठी जीवनप्रवास करणे इतरांइतके सोपे नक्कीच नसते. शर्वाणी कबाडी या मल्टिपल डिसअ‍ॅबल मुलीने मात्र इतरांनाही प्रेरणादायी ठरेल, अशी जिद्द बाळगली असून, ती आता गायन क्षेत्रात लक्ष वेधून घेत आहे.

ठळक मुद्दे ती शारीरिक आणि मानसिकदृष्ट्याही सक्षम झाली

शर्वाणीच्या आवाजातील जादूलहानपणी एक सुरात गाणे म्हणणारी शर्वाणी आयुष्यात गाण्यातूनच नवी ओळख निर्माण करेल, असे वाटले नव्हते; परंतु आता तिच्या गाण्यातील प्रगती पाहता ती ध्येयाकडे नक्कीच पोहचेल, असे एकूणच तिचे व्यक्तिमत्त्व आकार घेत आहे. प्रत्येकाच्या आयुष्यात चढउतार हे येतच असतात; परंतु नैसर्गिकरीत्या ज्यांच्या नशिबी अपंगत्व येते त्यांच्यासाठी जीवनप्रवास करणे इतरांइतके सोपे नक्कीच नसते. शर्वाणी कबाडी या मल्टिपल डिसअ‍ॅबल मुलीने मात्र इतरांनाही प्रेरणादायी ठरेल, अशी जिद्द बाळगली असून, ती आता गायन क्षेत्रात लक्ष वेधून घेत आहे.वय वर्ष १८, शर्वाणी कबाडे हिने गायनाची पहिली परीक्षा द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण करून आपल्यातील कर्तृत्व सिद्ध केले आहे. अर्थात हा प्रवास काही एकाकी घडलेला नाही. त्यामागे तिची जिद्द आणि आई डॉ. राजश्री कबाडे यांची मेहनत आहे. लहानपणापासूनच शर्वाणीचा गोड गळा असल्याची बाब डॉ. राजश्री यांच्या लक्षात आली. त्याचवेळी त्यांनी तिच्यातील गायन कौशल्याला पैलू पाडण्याचे ठरविले. यासाठी त्यांनी अनेकांकडे विचारणा केली; मात्र सहजासहजी होकार कुठूनच मिळत नव्हता. अशातच नॅब डिसअ‍ॅबल सेंटरच्या शुक्ल यांनी राजश्री कबाडे यांना बोहोरपट्टीतील जोशी सर यांच्याकडे पाठविले. त्यांच्या प्रेरणा आणि प्रोत्साहनामुळे उभारी मिळाली आणि त्यांनी गायन शिक्षक योगेश जाधव यांना घरीच शर्वाणीची शिकवणी सुरू केली. शर्वाणीच्या आवाजातील गोडवा पाहून कुटुंबातील सर्वच खूश झाले. सरांनाही तिच्यात कौशल्य दिसले आणि त्यांनी यासाठी मोठे परिश्रम घेतले. शर्वाणीला वेळोवेळी सक्षम आधार मिळाल्याने तिच्यातील कमतरता कमी होऊन ती शारीरिक आणि मानसिकदृष्ट्याही सक्षम झाली आहे.