शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

वंचित मुलांसाठी भरतात साक्षरता वर्ग

By admin | Updated: July 8, 2017 01:15 IST

नाशिक : कितीही घोषणा दिल्या जात असल्या तरी पैसा, परिस्थिती आदि विविध कारणांमुळे प्रत्येकालाच शिक्षण घेणे शक्य होत नाही.

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : शिकाल तर टिकाल’, ‘ज्ञानाचा दिवा घरोघरी लावा’ अशा कितीही घोषणा दिल्या जात असल्या तरी पैसा, परिस्थिती आदि विविध कारणांमुळे प्रत्येकालाच शिक्षण घेणे शक्य होत नाही. अशा शिक्षणाच्या प्रवाहातुन बाजूला पडलेल्यांना पुन्हा एकदा ज्ञानामृत देऊन शिक्षित करणे, स्वत:चे स्थान निर्माण करण्यास मदत करणे हे काम शहरातील सामाजिक संस्था आणि वैयक्तिक स्तरावर अनेकजण करीत आहेत. आज साजऱ्या होणाऱ्या ‘राष्ट्रीय साक्षरता दिनी’ त्यांच्या कार्याचा हा आढावा.दिशा संस्था : आनंदवलीजवळील विश्वास लॉन्स परिसरातील मोकळ्या मैदानावर २००५ पासून सुधा मेहता या गरीब मुलांना ‘दिशा’ अंतर्गत मोफत शिकविण्याचे काम करीत आहेत. पहिली ते दहावीच्या गरीब मुलांची शिकवणी घेतली जात आहे. सुधातार्इंना कल्पना ओहोळ, संगीता देशमुख, रेखा राजभर, स्नेहल कुलकर्णी, सुरेश दीक्षित, बिडवई या शिक्षकांचे बळकट हात लाभले आहेत. आपापली कामे सांभाळून हे शिक्षक मुलांना शिकवित आहेत. स्वयंसेवी संस्था, दानशूर व्यक्ती, जायंट ग्रुपसारख्या सामाजिक संस्था आर्थिक पाळबळ देण्याचे काम करीत आहेत. सेवा संस्था : सोशल एम्पॉवरमेंट फॉर व्हॉलेंटीअरी अ‍ॅक्शन अर्थात सेवा संस्था अनेक वर्षांपासून शहरातील शाळाबाह्य आणि शाळेत जाणाऱ्या, मात्र अभ्यासात कच्च्या असणाऱ्या, पेठरोडवरील अंबिकानगर आणि गंजमाळ जवळील भीमवाडी झोपडपट्टीतील मुलांच्या शिक्षणाचे काम करीत आहे. या संस्थेचे कार्यकर्ते अ‍ॅड. राजपाल शिंदे, दीपक देवरे, राणी जाधव, वैशाली राऊत, विनय कटारे यासाठी कार्यरत आहेत. यावर्षी या झोपडपट्टीतील १३ मुलांना त्यांच्या राहिलेल्या विषयांची तयारी करून घेण्याबरोबर कॉलेजच्या अ‍ॅडमिशनचेही काम करवून घेण्यात आले आहे. युवान ग्रुप : वेगवेगळ्या शाखांमध्ये उच्च शिक्षण घेणाऱ्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी युवान ग्रुपची अनौपचारिकरीत्या स्थापना केली. या ग्रुपमधील अपूर्व इंगळे, विराज देवांग, आदित्य भागवत, अभिषेक शिंपी, वेदांग जोशी, समाधान भारतीय यांसारख्या २० जणांनी दर शनिवारी, रविवारी सायंकाळी भीमवाडी झोपडपट्टी, अंबिकानगर, आम्रपाली झोपडपट्टी, आनंदवली येथे मुलांना शिकविण्यास जातात.