नाशिक : जिल्हा परिषदेत राजीव गांधी पंचायत सशक्तीकरण अभियानांतर्गत विविध पदांकरिता कंत्राटी पद्धतीने भरतीप्रक्रिया राबविण्यात येत असून, या भरतीसाठी पात्र लाभार्थ्यांची यादी जिल्हा परिषदेत फलकावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. या पदांकरिता ९ आॅगस्टच्या वर्तमानपत्रात जाहिरात देण्यात आली होती. या पदांमध्ये लिपिक, लेखापाल, कार्यालयीन सहायक, परिचर, गट अभियंता, पंचायत अभियंता, जिल्हा पेसा समन्वयक व तालुका पेसा समन्वयक या पदांचा समावेश होता. प्राप्त अर्जांची छाननी करून पात्र व अपात्र उमेदवारांची यादी जिल्हा परिषदेच्या सूचना फलकावर प्रसिद्ध करण्यात आली असून, सदर यादीबाबत ३ सप्टेंबरपर्यंत उमेदवारांनी कार्यालयीन वेळेत लेखी स्वरूपात आक्षेप नोंदवावेत, असे आवाहन सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे यांनी केले आहे.(प्रतिनिधी)
भरतीपात्र उमेदवारांची यादी जाहीर
By admin | Updated: August 31, 2014 00:48 IST