शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

दारू दुकान विरोधकांचे होणार जाबजबाब

By admin | Updated: May 7, 2017 00:11 IST

नाशिक : दारू दुकानांविरोधात अलीकडेच समाजमनाकडून अचानक होऊ लागलेल्या विरोधामुळे राज्य उत्पादन शुल्क तसेच पोलीस खातेही चक्रावले

 लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : वर्षानुवर्षे मद्यविक्रीचा व्यवसाय करणाऱ्या दारू दुकानांविरोधात अलीकडेच समाजमनाकडून अचानक होऊ लागलेल्या विरोधामुळे राज्य उत्पादन शुल्क तसेच पोलीस खातेही चक्रावले असून, दारू दुकाने बंद करणारे आंदोलक व विरोधकांच्या नावानिशी जाब जबाब घेऊन वस्तुस्थिती जाणून घेण्याचा निर्णय राज्य उत्पादन शुल्क खात्याने घेतल्यामुळे खात्री पटल्याशिवाय मद्यविक्रीची दुकाने बंद होण्याची शक्यता तशी कमीच आहे. सर्वोच्च न्यायालयाने राज्य व राष्ट्रीय महामार्गाच्या पाचशे मीटर अंतरातील मद्यविक्रीची दुकाने बंद करण्याचे आदेश दिल्यानंतर या आदेशाचा आधार घेत शहरी व ग्रामीण भागात सुरू असलेल्या देशी-विदेशी दारू विक्रीची दुकानेही बंद करण्यात यावी यासाठी ठिकठिकाणी आंदोलने सुरू झाली आहेत. त्यासाठी धरणे, मोर्चे काढले जात असून, काही ठिकाणी नागरिकांनीच कायदा हातात घेऊन दुकाने बंद करण्याची कारवाई केली आहे. शहराच्या मध्यवस्तीत असलेली ही दुकाने गेल्या अनेक वर्षापासून मद्यविक्री करीत असून, त्यासंदर्भात कधीही स्थानिक नागरिकांनी हरकती वा विरोध केलेला नाही किंबहुना तशी नोंद संबंधित पोलीस ठाणे व राज्य उत्पादन शुल्क खात्याकडेही करण्यात आलेली नाही; मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर प्रत्येकच मद्यविक्रीची दुकाने बंद करावीत यासाठी आंदोलने होऊ लागल्याचे पाहून राज्य उत्पादन शुल्क खात्याने आश्चर्य व्यक्त केले आहे. दारू दुकाने बंद करण्याच्या मागणीमागचे सत्य तपासून पाहण्यासाठी ज्या ज्या नागरिकांनी दुकान बंद करण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क खात्याकडे तक्रारी वा निवेदने दिली आहेत अशा दुकानांची तसेच आंदोलनकर्त्याची चौकशी करण्यात येणार असून, नागरिकांच्या तक्रारीची शहानिशा करून राज्य उत्पादन शुल्क निरीक्षक आपला अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना सादर करणार आहे. यासाठी विरोधकांचे जाब जबाब नोंदवून घेतले जाणार आहेत. आंदोलनकर्त्यांची तक्रार व वस्तुस्थिती तपासून जिल्हाधिकारी या संदर्भात अंतिम निर्णय घेणार आहेत. त्यामुळे निव्वळ आंदोलन केले म्हणून दारू दुकान बंद होईल अशी अपेक्षा बाळगणे गैर आहे.