शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

मळगाव बंधाऱ्यातील गाळाचा उपसा

By admin | Updated: December 31, 2015 22:27 IST

सटाणा : परिसर होणार टॅँकरमुक्त; रब्बीला आधार; साठवले साडेचार दलघफू पाणी

सटाणा : शहरासाठी पाणीटंचाई तशी पाचवीला पुजलेलीच. डिसेंबरपासूनच प्रशासनाला टंचाई निवारणासाठी कसरत करावी लागते. त्यातच नववसाहत भागातील पाण्यासाठीची ओरड यावर पालिकेचे गटनेते काका रौंदळ, प्रगतिशील शेतकरी मधुकर नानाजी सोनवणे यांनी पुढाकार घेत शहरालगत असलेल्या मळगाव वळण बंधाऱ्यात गेल्या पंधरा वर्षांपासून साचलेला गाळ लोकसहभागातून उपसण्याचे काम केले. साडेपाच लाख रुपये खर्चून सुमारे वीस हजार मेट्रिक टन गाळ उपसण्यात आला. यामुळे बंधाऱ्यात तब्बल साडेचार दलघफू पाणी साठून भूजल पातळीत वाढ झाली. यामुळे सुमारे एक हजार हेक्टर क्षेत्रावरील रब्बी पिकांना या पाण्याचा आधार तर मिळालाच; परंतु शहरातील सुमारे साडेसहाशे खासगी आणि सार्वजनिक विंधनविहिरीतील पाण्याच्या पातळीत वाढ होऊन संपूर्ण परिसर ‘जलयुक्त’ होण्यास मदत झाली आहे.शहराची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढते आहे. मात्र लोकसंख्येच्या तुलनेत असलेल्या पाणीपुरवठा योजना तुटपुंज्या ठरत आहेत. त्यातच नद्यानाल्यांना गेल्या सात ते आठ वर्षात पूर न गेल्यामुळे भूजलपातळी कमालीची खालावली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या विहिरी, पालिका प्रशासनाच्या विहिरी, शहरातील खासगी आणि सार्वजनिक विंधनविहिरी ठप्प झाल्या आहेत. परिणामी टँकरने पाणीपुरवठा करण्याची मागणी वाढत असते. डिसेंबर सुरू झाला की टॅँकर सुरू असे समीकरण ठरलेलेच. यावर मात करण्यासाठी शासन अथवा पालिका प्रशासनावर विसंबून न राहता पालिकेचे गटनेते काका रौंदळ, प्रगतिशील शेतकरी मधुकर नानाजी सोनवणे, प्रदीप उखा सोनवणे यांनी जलसुरक्षित करण्याचा निर्धार केला. त्यांनी पुढाकार घेऊन आरम नदीवर बांधलेल्या मळगाव वळण बंधाऱ्यात गेल्या पंधरा वर्षांपासून साचलेला गाळ उपसण्याबरोबरच शिरपूर पॅटर्नच्या धर्तीवर नदी खोलीकरण व रुंदीकरणाच्या कामासाठी लोकसहभागाची संकल्पना पुढे आणली आणि त्याला शेतकऱ्यांनी भरभरून प्रतिसाद दिला. दोन जेसीबी आणि वीस ट्रॅक्टरने पंधरा दिवस गाळ उपसण्याचे काम करून वीस हजार मेट्रिक टन गाळ काढला. तसेच नदी पात्राचे खोली वाढवून रुंदीकरण करण्यात आले. यामुळे या बंधाऱ्यात पाण्याची साठवणूक झाल्यामुळे सटाण्याची जलश्रीमंती दुष्काळी गावासाठी नक्कीच प्रेरक ठरेल.