न्यायडोंगरी : अंधश्रद्धेला थारा न देता विज्ञानाला अध्यात्माची योग्य जोड दिल्यास मनुष्य जीवन खऱ्या अर्थाने सार्थक होईल, असे प्रतिपादन मध्य प्रदेशातील खेतीया येथील ‘श्रीकृष्ण गो संस्थानच्या’ १००८ महामंडलेश्वर स्वामी रामानंदपुरी महाराज यांनी येथे आयोजित श्रीमद् भाागवत सप्ताहात केले. येथील मोरेश्वरनगरच्या तांडा भागात या नियोजनबद्ध व भक्तीमय वातावरणात पार पडलेला हा सत्संग यशस्वी करण्यासाठी येथील तुलसीदास राठोड, धनराज चव्हाण, कैलास राठोड, चांगदेव चव्हाण, रवींद्र राठोड, विष्णू चव्हाण, रायसिंग चव्हाण, पांडुरंग राठोड, भीमराव चव्हाण, संभाजी मोतीराम यांच्यासह सर्व ग्रामस्थांनी परिश्रम घेतले. येथे दरवर्षी आठवडाभर चालणाऱ्या या उत्सवात संगीतमय श्रीमद् भागवत ज्ञानयज्ञाचे आयोजन करण्यात येते. यात प्रभात फेरी, काकड आरती, भजन, हरिपाठ व रात्री ८ ते ११ वाजेदरम्यान भागवत कथा असे कार्यक्रम होतात. (वार्ताहर)
विज्ञानाला अध्यात्माची जोड दिल्यास जीवन सार्थक होईल : रामानंदपुरी
By admin | Updated: October 13, 2015 22:12 IST