शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

चांदवडला संपामुळे जनजीवन विस्कळीत

By admin | Updated: June 4, 2017 01:17 IST

चांदवड : येथे शेतकरी संपास तिसऱ्या दिवशीही प्रतिसाद मिळाला. चांदवड शहरातील दूध विक्री केंद्र व भाजीपाला विक्री केंद्र बंद असल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे

 लोकमत न्यूज नेटवर्कचांदवड : येथे शेतकरी संपास तिसऱ्या दिवशीही प्रतिसाद मिळाला. चांदवड शहरातील दूध विक्री केंद्र व भाजीपाला विक्री केंद्र बंद असल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. संपाच्या पहिल्या दिवशी गृहिणींनी अधिक दूध घेऊन ठेवल्याने फारशी अडचण जाणवली नाही. मात्र दुसऱ्या दिवशी दुधाची तीव्र टंचाई जाणवू लागली. अनेकांनी कोरा चहा पिऊन दिवस पास केला. त्यात काहींनी तर पावडरच्या दुधाला पसंती दिली. संपामुळे सर्वसामान्यांसह लहान मुलांचे दुधावाचून मोठे हाल झाल्याचे दिसून आले. शहरी भागातील परिस्थिती व ग्रामीण भागातील परिस्थितीमध्ये मोठी तफावत आहे. ग्रामीण भागात शेतकरी समाज जास्त असल्याने या संपाची तीव्रता ग्रामीण भागात जास्त जाणवून आल्याचे बोलले जात आहे. एक वेळ भाजीपाला नसला तरी प्रत्येक गृहिणी दाळी करुन आपली उपजीविका भागवत असली तरी दुधाची तीव्रता जास्त जाणवत होती. पहिल्याच दिवशी हॉटेल व दूध विक्री केंद्र बंद झाल्याने बसस्थानक, पेट्रोलपंप, बाजारात चहाच्या टपऱ्या व हॉटेलमध्ये चहा मिळत नसल्याचे चित्र दिसत होते. दरम्यान, चांदवड तालुका अ‍ॅग्रो डिलर्स असोसिाएशनच्या वतीने किसान क्रांती आंदोलनाच्या संपास पाठिंबा दिला असून, शुक्रवारी तालुक्यातील खते , बि-बियाणे विक्रीकरणाऱ्या दुकानदारांनी एकदिवसीय बंद पाळून संपात सहभाग नोंदविला. या संपाबाबतचे निवेदन चांदवडचे तहसीलदारांना देण्यात आले. चांदवडचे पोलीस निरीक्षक अनंत मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक जितेंद्र भारती, पोलीस उपनिरीक्षक कैलास चौधरी व पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला.