शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
2
कपिल शर्माच्या कॅनडा कॅफेमध्ये पुन्हा गोळीबार, 'या' गुंडाने व्हिडीओ पोस्ट करून जबाबदारी घेतली
3
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
4
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
5
शुबमन गिलची आशिया कपसाठीच्या संघातून सुट्टी? Duleep Trophy स्पर्धेत लागलीये कॅप्टन्सीची ड्युटी
6
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
7
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट
8
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
9
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
10
VIDEO : सॉरी सॉरी...! वैभव सूर्यवंशीची पॉवर; गोळीच्या वेगानं मारला चेंडू; बचावासाठी कॅमेरामनची 'कसरत'
11
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सॅमसंगने आणलाय 5G फोन, किंमतही कमी!
12
रिक्षातून घरी जाणाऱ्या महिलेचं अपहरण, कारमध्ये नेऊन बलात्काराचा प्रयत्न, पाच जणांविरोधात गुन्हा दाखल
13
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी
14
संजू सॅमसन राजस्थानची साथ सोडणार, मॅनेजमेंटकडे रिलीज करण्याची विनंती; पण नियम काय सांगतो?
15
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
16
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
17
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
18
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
19
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
20
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा

जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2016 22:30 IST

बळीराजा आनंदला : बंधाऱ्यांच्या पातळीत वाढ; संततधार कायम

नाशिक : बागलाणसह त्र्यंबकेश्वर व सुरगाणा येथे झालेल्या मुसळधार पावसामुळे रविवारी जनजीवन विस्कळीत झाले होते.सटाणा शहर व तालुक्यात बळीराजाच्या आशा पल्लवित झाल्या असून, खरिपाच्या पेरणीला आता वेग येणार आहे. दरम्यान, धरणांच्या पाणलोटक्षेत्रात दोन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधारेमुळे पाण्याच्या पातळीत चांगल्यापैकी वाढ होत असल्यामुळे समाधानाचे वातावरण आहे.बागलाण तालुक्यात यंदाच्या हंगामात मृगाच्या अखेरच्या दिवशी बरसलेल्या चाळीस मिनिटांच्या पावसानंतर आज दुसऱ्यांदा पावसाला सुरुवात झाली. तब्बल चाळीस दिवस ऊन-सावलीच्या खेळामुळे बळीराजा चिंताग्रस्त झाला होता.सलग चार वर्षांपासूनच्या दुष्काळी स्थितीमुळे शेतकरी पूर्णपणे कोलमडला आहे. थोडीफार पुंजी शिल्लक होती तिही यंदा खरिपाच्या मशागतीला आणि बियाणे व खताच्या खरेदीसाठी खर्ची पडली होती. मात्र पावसाचा मागमूसही दिसत नसल्याने भयावह परिस्थिती निर्माण झाली होती. मुल्हेर, अंतापूर, ताहाराबाद, सोमपूर, जायखेडा, आसखेडा, ब्राह्मणपाडा, द्याने, नामपूर, राजपूर पांडे, उत्राणे, अंबासन तसेच काटवन परिसरातील चिराई, राहूड, बिलपुरी, टेंभे, इजमाणे, श्रीपूरवडे, नांदीन, दरेगाव, दसवेल, पिंपळकोठे, भडाणे व करंजाडी खोऱ्यातील मुंगसे, पिंगळवाडे, करंजाड, भुयाणे, निताने, पारनेर, लादुद, बिजोटे, आखतवाडे, आनंदपूर, गोराणे, वीरगाव, डांगसौंदाणे, निकवेल, दसाणे, केरसाणे, ब्राह्मणगाव, लखमापूर, अजमीर सौंदाणे, आराई, शेमळी, देवळाणे आदि भागात सायंकाळपर्यंत संततधार सुरूच होती. पावसामुळे खोळंबलेल्या खरीप पेरण्यांना वेग येणार आहे. (लोकमत चमू)