शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

जनजीवन विस्कळीत

By admin | Updated: June 25, 2017 00:16 IST

नाशिक : बारा दिवसांच्या विश्रांतीनंतर शहर व परिसरात शनिवारी (दि.२४) वरुणराजाने सकाळी हजेरी लावली. दिवसभर सुरू असलेली संततधार व ढगाळ हवामानामुळे नाशिककरांना सूर्यदर्शन दुर्लभ झाले.

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : बारा दिवसांच्या विश्रांतीनंतर शहर व परिसरात शनिवारी (दि.२४) वरुणराजाने सकाळी हजेरी लावली. दिवसभर सुरू असलेली संततधार व ढगाळ हवामानामुळे नाशिककरांना सूर्यदर्शन दुर्लभ झाले. शहरासह जिल्ह्यात मान्सून सक्रिय झाला असून, पुढील दोन ते तीन दिवस मान्सून सरींचा वर्षाव समाधानकारक राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तविण्यात आला आहे. चालू महिन्यात बुधवारी (दि.१४) शहरात दीड तास मुसळधार पावसाने शहरवासीयांची दाणादाण उडविली होती. शनिवारी झालेल्या संततधारेने शहरात संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत ५४ मि.मि. पावसाची नोंद झाली होती. तब्बल बारा दिवसांनंतर पुन्हा शनिवारी  सकाळपासूनच शहरासह उपनगरीय भागांमध्ये जोरदार संततधारेला सुरुवात झाल्याने मान्सून सक्रिय झाला. सकाळपासून ढगाळ हवामान आणि पावसाची संततधारेमुळे नाशिककरांना सूर्याचेही दर्शन होऊ शकले नाही.नाशिकरोड परिसरात व आजुबाजूच्या भागांमध्ये शनिवारी पहाटेपासुन दिवसभर सुरू असलेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते. नाशिकरोड व आजुबाजूच्या भागांमध्ये गेल्या पाच-सात दिवसांपासून पावसाने दडी मारली होती. त्यामुळे उन्हाचा चटका काही प्रमाणात जाणवत होता. मात्र शनिवारी पहाटेपासुन नाशिकरोड व आजुबाजूच्या भागांमध्ये दिवसभर रिमझीम पाऊस सुरू होता. एकसारखा पाऊस पडत असल्याने रस्त्याच्या आजुबाजूला व उघड्यावर बसणाऱ्या विक्रेत्यांनी दुकाने थाटली नव्हती. तर पावसामुळे रस्त्यावरील वर्दळ देखील कमी झाली होती. पावसाच्या सरी एकसारख्या पडत असल्याने सर्वत्र पाण्यामुळे चिकचिक झाली होती. पावसामुळे सर्व व्यवसायावर कमी-जास्त परिणाम झाला होता. यामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते. काही भागांमध्ये व रस्त्यावर पावसाचे पाणी साचले होते. तर वीजेचा लपंडाव देखील सुरू होता.