शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

ग्रंथालय सप्ताहाची सांगता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2019 16:45 IST

सिन्नर : डफ, ढोलकी, संबळच्या निनादात शिवकाल उभा करणाऱ्या उत्साहवर्धक पोवाड्यांनी सिन्नर ग्रंथालय सप्ताहाची सांगता झाली.

ठळक मुद्देछत्रपती शिवरायांच्या जन्मापूर्वी झालेली मराठी मुलखाची दुर्दशा, शहाजी राजे व माता जिजाऊंनी बाल शिवाजीकडून आपल्या स्वराज्यसंकल्पनेची पूर्ती व्हावी यासाठी केलेले संस्कार, शिवरायांनी उभारलेले स्वराज्य, शंभूराजांचे बलिदान ते पराक्रमी ताराराणींनी शत्रूला पाजलेल

सिन्नर : डफ, ढोलकी, संबळच्या निनादात शिवकाल उभा करणाऱ्या उत्साहवर्धक पोवाड्यांनी सिन्नर ग्रंथालय सप्ताहाची सांगता झाली.शिवशाहीर स्वप्नील डुंबरे यांनी आपल्या पहाडी आवाजातील कवनांनी सुमारे दोन तासाहून अधिकवेळ श्रोत्यांना खिळवून ठेवले. वाचनालयाचे ज्येष्ठ संचालक पी. एल. देशपांडे यांनी त्यांचे वडील माजी नगराध्यक्ष लक्ष्मण नानाजी देशपांडे यांच्या स्मृतिप्रीतर्थ हा कार्यक्रम प्रायोजित केला होता.काळ्या आईची करीतो सेवा, साºया जगाचा पोशिंदा, नाही केला माझ्या मातीचा कधीच मी धंदा असे बळीराजाचे वर्णन करताना शाहिरांनी शेतकऱ्यांनी आत्महत्या करू नये यासाठी कळकळीचे आवाहन करत प्रबोधन केले.शिवरायांनी स्वराज्यस्थापनेसाठी जिजाऊंच्या मार्गदर्शनाखाली केलेली वाटचाल त्यांनी कवनातून सांगितली. बालशिवाजी नाव ठेवता, राजे शहाजी शोभता पिता, माता जिजाऊ गाता पाळणा जो बाळा जो जो रे जो! असा पाळणाही शाहीर डुंबरे यांनी गोड आवाजात सादर केला.पहाडी तेवढाच गोड आवाज, हृदयाला हात घालणारी प्रसंग डोळ्यांपुढे उभी करणारी कवने आणि त्याला साजेशा आवेशात डफ वाजवत डुंबरे यांनी श्रोत्यांची मने जिंकून घेतली. विशाल, अक्षय व विक्रम नन्नावरे या गायक बंधूंनी त्यांना साथ दिली. नीलेश तेल्हुरे (ढोलकी), आकाश बैराजी (चंडा), विजय बाकळे (आॅर्गन), शुभम यादव (संवादिनी), रोशन भिसे (संबळ) या वाद्य वाजविणाºया सहकाºयांनी तेवढ्याच तन्मयतेने पोवाड्यास साथसंगत केल्याने उपस्थित असलेले श्रोते भारावून गेले.  -