नाशिक : ‘गोविंदा आला रे आला, चला करू या गोपाळकाला’ अशा प्रकारची गाणी म्हणत श्रीकृष्ण-राधेच्या वेशभूषेत नृत्य करीत विद्यार्थ्यांनी दहीहंडीचा उत्सव जल्लोषात साजरा केला. तसेच विविध संस्था-संघटना यांच्या वतीने सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.श्रीकृष्ण चॅरिटेबल ट्रस्टचेतनानगर येथील श्रीकृष्ण चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने आयोजित दोन दहीहंडी सह्याद्री युवक मित्रमंडळ व जाजू विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी फोडत रोख दहा हजार आणि पाच हजार रुपयांचे बक्षीस मिळविले. याप्रसंगी व्यासपीठावर सिडको ब्लॉक अध्यक्ष मीरा साबळे, दिलीप कोरडे, धनंजय बेळे, पंडित धात्रक, कमलेश येवले यांच्या हस्ते विजेत्यांना बक्षिसे देण्यात आली. कार्यक्रमाचे आयोजन माजी नगरसेवक अमोल जाधव यांनी केले होते.कन्हैया फाउंडेशनकन्हैया फाउंडेशन आयोजित कृष्ण जन्मोत्सवप्रसंगी महानुभाव पंथाचे उपाध्यक्ष कुलाचार्य वर्धनस्थ बीडकर बाबा यांच्या हस्ते विधिवत पूजा करण्यात आली. तसेच यावेळी विविध सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले. यावेळी नगरसेवक लक्ष्मण जायभावे, पुंजाराम गामणे, पुंडलिक आव्हाड, सुदर्शन आव्हाड, स्वप्नील गामणे आदि उपस्थित होते.श्यामकांत शिक्षण मंदिरसाने गुरुजी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्यामकांत शिवराम शिक्षण मंदिर, शिखरेवाडीतील शाळेत दहीहंडी साजरी करण्यात आली. अनेक बालगोपालांनी राधाकृष्णाच्या वेशभूषेत फेर धरून नृत्य केले. बाळकृष्णाच्या हस्ते दहीहंडी फोडण्यात आली. कार्यक्रमास मुख्याध्यापक भडांगे यांच्यासह सर्व शिक्षक, विद्यार्थी व पालक सहभागी झाले होते.किड्स कॅम्पसकिड्स कॅम्पस इंग्लिश मीडियम प्री स्कूल वाढणे कॉलनी, म्हसरूळ येथे गोकुळअष्टमी उत्साहात साजरी करण्यात आली. दहीहंडी उत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी राधा कृष्णाची वेशभूषा केली होती. दोन थर देऊन दहीहंडी फोडण्यात आली. यावेळी संस्थेचे अध्यक्ष रावसाहेब रमेश हिरे, मुख्याध्पाक मनीषा हिरे, अंकिता पाटील आदि उपस्थित होते.वंडर किड्सम्हसरूळ येथील वंडर किड्स प्ले स्कूल अॅण्ड नर्सरीमध्ये बालगोपाळांनी गोकुळाष्टमी सण उत्साहात साजरा केला. यावेळी चिमुकल्यांनी दहीहंडी फोडली. शिक्षकांनी गोपाळकाल्याचे महत्त्व मुलांना नाटकाच्या सादरीकरणातून दाखविले. यावेळी संस्थेचे प्रमुख पराग झालावात व मुख्याध्यापक उर्मी झालावात, वैशाली शेवाळे, स्नेहा देवरे, रुपाली धूम, अर्चना गावित, प्रिया भदाणे, शुभांगी बोडके आदि उपस्थित होते.अभिनव शाळामविप्र समाज संस्थेच्या आदर्श शिशु विहार व अभिनव बाल विकास मंदिर, गंगापूररोड, या शाळेत कृष्णजन्माष्टमी व दहीहंडीचा कार्यक्रम उत्साहात साजरा झाला. याप्रसंगी मुख्याध्यापक मीनाक्षी गायधनी, वैशाली देवरे व उज्ज्वला कवात या सर्वांनी दहीहंडीचे पूजन केले. प्रतिभा बोऱ्हाडे यांनी कृष्ण जन्माष्टमीची माहिती सांगितली. सर्व विद्यार्थ्यांनी कृष्णाच्या गीतांवर टिपऱ्या खेळून नृत्यानंद लुटला.
चला करूया गोपाळकाला...
By admin | Updated: August 26, 2016 22:38 IST