शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
3
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
4
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
5
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
6
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
7
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
8
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
9
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
10
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
11
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
12
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
13
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
14
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
15
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
16
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
17
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
18
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
19
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
20
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
Daily Top 2Weekly Top 5

चला करूया गोपाळकाला...दहीहंडी

By admin | Updated: August 27, 2016 22:15 IST

उत्सव : शाळांमध्ये विविध सांस्कृतिक कार्यक्रम

नटखट मित्रमंडळ घोटी : नटखट मित्रमंडळ आयोजित दहीहंडी उत्सव जैन मंदिर चौक येथे मोठ्या उत्साहात पार पडला. गत २१ वर्षांपासून इगतपुरी तालुक्यात सर्वात मानाच्या मोठ्या दहीहंडीचे आयोजन नटखट मित्रमंडळाचे संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय मिलिंद वालतुले यांनी सुरू केले होते. तीच दहीहंडीची परंपरा पुढे अखंड राखत मोठ्या उत्साहात पार पडली. नटखट मित्रमंडळ आयोजित २१ हजार रुपयांची दहीहंडी गजानन मित्र मंडळाने फोडली असून याप्रसंगी जनसेवा पतसंस्थेचे सर्व संचालक व नटखट मित्रमंडळाचे पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते. याप्रसंगी जनसेवा पतसंस्थेचे चेअरमन विठ्ठल काळे, व्हाइस चेअरमन ललीत पिचा, मंगेश काळे, पारस राखेचा, तुषार बोथरा, पिंटू बेदमुथा, ज्ञानेश्वर बुधवारे, अभय बोथरा, वीरेंद्र बेदमुथा, राजाराम घाणे, संतोष सोनार, सूरज शहा, दिलीप लद्दड आदि उपस्थित होते. याप्रसंगी सूत्रसंचालन सचिन खिवंसरा यांनी केले. घोटी येथील नटखट मित्रमंडळाने दहीहंडी बक्षिसाची रक्कम १२१ रुपयांपासून २१ व्या वर्षी २१ हजारांची केली. दरवर्षी यात वाढ होत असून यापर्षी ही मानाची दहीहंडी गजानन मित्रमंडळाने फोडली. याप्रसंगी चित्तथरारक मनोऱ्यांचे प्रात्यक्षिक गोविंदा पथकांनी दाखविले.निफाड परिसरनिफाड : शहर व ग्रामीण परिसरात विविध शाळा, संस्था आणि मंडळांनी पारंपरिक पद्धतीने गोपाळ- काल्यानिमित्त दहीहंडी जल्लोषात साजरी केली. यावेळी गोविंदारे गोपालासह अन्य कृष्ण गीतांवर अनेकांनी फेर धरला. निफाड येथील वैनतेय इंग्लिश मीडियम स्कूल येथे चिमुकल्यांनी गोपालकाला उत्साहात साजरा केला. चिमुकल्यांनी दहीहंडी फोडून श्रीकृष्णाचा जल्लोष केला व गोविंदा आला रे आला, श्रीकृष्णाच्या गाण्यांवर चिमुकल्यांनी सामूहिक नृत्य केले. याप्रसंगी न्या. रानडे विद्या प्रसारक मंडळाचे कार्यकारी विश्वस्त प्रल्हाद पाटील कराड, विश्वस्त दिलीप वाघवकर, वैनतेय विद्यालयाचे प्राचार्य के. के. निकम, वैनतेय इंग्लिश मीडियम स्कूलच्या पर्यवेक्षक सानप यांच्यासह शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते. शहरातील जि.प. शाळा नं. एकमध्ये विद्यार्थ्यांनी राधाकृष्णाचा वेश परिधान करत गरबासह टिपरी नृत्य सादर करत दहीहंडी फोडली. यावेळी मुख्याध्यापक नीलेश शिंदे, केंद्रप्रमुख सोमनाथ चित्ते, अविनाश शिंदे, विजय डेर्ले, सुजित गायधनी, श्याम पाटील, मनीषा रायजादे, वनीता गोसावी, अनिता कारले, ललीता शिंदे, बबिता जाधव, धनश्री वाघ तसेच शिक्षक उपस्थित होते. कोठुरे शाळेत गोपालकाल्यानिमित्त दहीहंडी उत्सव साजरा करण्यात आला. यावेळी शिक्षक मधुकर झेंडे यांनी विद्यार्थ्यांना श्रीकृष्ण लीलेबाबत माहिती दिली. यावेळी मुख्याध्यापक प्रकाश कोकाटे, धर्मेंद्र सोनवणे, मधुकर खुळे, ज्योती ताडगे, राजाभाऊ कदम, नंदकुमार सूर्यवंशी, कल्पना गोसावीसह विद्यार्थी, पालक उपस्थित होते. गोळेगाव येथे नव्याने सुरू झालेल्या बाबूराव तुकाराम ठुबे बहुउदेशीय संस्था संचलित लिटील फ्लॉवर इंग्लिश मीडियम स्कूल येथे कृष्ण जन्माष्टमीनिमित्त दहीहंडी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या प्रसंगी विद्यार्थ्यांनी राधाकृष्णाची वेशभूषा परिधान केली होती. यानिमित्त विद्यार्थ्यांनी गौळण सादर केली. (लोकमत चमू)