शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
4
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
5
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
6
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
7
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
8
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
9
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
10
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
11
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
12
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
13
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
14
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
15
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
16
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
17
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
18
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
19
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
20
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
Daily Top 2Weekly Top 5

...चला साजरा करूया हजारो झाडांचा ‘बर्थ-डे’

By admin | Updated: May 28, 2017 01:42 IST

नाशिक : ‘झाडे लावा, झाडे जगवा’ या घोषवाक्यानुसार प्रत्यक्ष कृतीतून वनमहोत्सव आयोजित केला होता.

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : ‘झाडे लावा, झाडे जगवा’ या घोषवाक्यानुसार प्रत्यक्ष कृतीतून दोन वर्षांपूर्वी वनविभागाच्या जागेत आपलं पर्यावरण संस्थेने वनमहोत्सव आयोजित केला होता. यावेळी हजारो हातांनी एकत्र येऊन दिवसभरात सुमारे अकरा हजार रोपांची लागवड केली होती. लावलेली झाडे जगविण्याची जिद्द प्रत्येकाच्या मनात निर्माण व्हावी, या उद्देशाने येत्या पर्यावरण दिनाच्या औचित्यावर येथील शंभर प्रजातींच्या हजारो झाडांचा ‘बर्थ-डे’ साजरा करण्याचा उपक्रम राबविला जाणार आहे.सातपूरजवळील फाशीचा डोंगर आता ‘नाशिक देवराई’ बनला आहे. या ठिकाणी लावण्यात आलेल्या हजारो पर्यावरणपूरक झाडांची झालेली दमदार वाढ त्याचे उदाहरण आहे. येत्या ५ जूनला देवराईवरील रोपटे दोन वर्षांचे पूर्ण होणार आहेत. यानिमित्ताने संस्थेने नाशिककरांनी लावलेल्या रोपट्यांचा ‘बर्थ-डे’ साजरा करण्यासाठी येण्याचे आवाहन केले आहे.येत्या ५ जून रोजी जागतिक पर्यावरण दिन सर्वत्र साजरा केला जाणार आहे. गेल्या वर्षीदेखील आपलं पर्यावरण संस्थेने म्हसरूळजवळील वन कक्षाच्या जागेत सुमारे साडेपाच हजार रोपांची लागवड करत पर्यावरण दिन साजरा केला होता. या दोन्ही ठिकाणांच्या रोपट्यांच्या संवर्धनाची पूर्णपणे जबाबदारी या संस्थेने सलग तीन वर्षांसाठी स्वीकारली आहे. लोकसहभागातून यशस्वी होणाऱ्या या प्रकल्पापासून प्रेरणा घेऊन नागरिकांनी पर्यावरणपूरक जागृती दाखवावी, हा झाडांचा वाढदिवस साजरा करण्यामागचा संस्थेचा हेतू आहे. यंदा मोठ्या संख्येने रोपट्यांची लागवड ओसाड जागेवर न करता या संस्थेने देवराईवर सर्व नाशिककरांना त्यांनी लावलेल्या रोपांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी सोशल मीडियावरून निमंत्रित केले आहे. पर्यावरण दिनाच्या औचित्यावर येथे येऊन झाडांना पाच लिटर पाण्याने भरलेला कॅन ‘गिफ्ट’ करण्याचे आवाहन व्हायरल झालेल्या पोस्टमधून करण्यात आले आहे. लोकांमध्ये झाडांविषयी आणि जैवविविधतेविषयी जनजागृती व्हावी आणि वृक्ष जगविण्याची जिद्द वाढावी हा यामागील उद्देश असल्याचे शेखर गायकवाड यांनी सांगितले.