शहरं
Join us  
Trending Stories
1
६ ऑगस्टला बच्चू कडू राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता; शेतकरी आंदोलनाला मनसेचं पाठबळ मिळणार?
2
"मराठीच्या आधी हिंदी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळाला, तेव्हा महाराष्ट्रही अस्तित्वात नव्हता"
3
एकनाथ शिंदेंनी केला करेक्ट कार्यक्रम, बेळगावात पक्ष बळकट होणार; अनेक मठाधिपती शिवसेनेत
4
“हिंदूंना बदनाम करण्याच्या आव्हाडांच्या आरोपांशी उद्धव ठाकरे सहमत आहेत का?”; भाजपाचा सवाल
5
धक्कादायक! रात्री ३ वाजता मुलीच्या खोलीत दिसले भयंकर दृश्य; वडिलांनी पाहताच पायाखालची जमीन सरकली
6
रीलस्टारलाही नॅशनल अवॉर्ड पण टीव्ही स्टार्सला नाही! स्पष्टच बोलली अनुपमा, म्हणाली- "आता स्मृती इराणींनी कमबॅक केलंय तर..."
7
"इतक्या दूरची नोकरी..."; रिक्षा चालकाने महिलेला रस्त्याच्या मध्येच सोडलं अन् विचारला प्रश्न
8
तिसऱ्या बाईच्या प्रेमासाठी दुसऱ्या पत्नीला संपवलं; नवऱ्याचं प्लॅनिंग, तान्ह्या बाळासमोर घडलं क्रूर कृत्य
9
जबरदस्त! ११३७ कोटींच्या मोहिमेसाठी सारा तेंडुलकरची निवड, सचिनच्या लेकीला मिळाली मोठी जबाबदारी
10
Baba Ramdev: "हिंदू धर्मात जन्मलेले काही लोक..." जितेंद्र आव्हांडाच्या वक्तव्यावर बाबा रामदेव यांची प्रतिक्रिया
11
मुलाची इंजिनियरिंग कॉलेजमध्ये निवड, पण फी चे पैसे जमवणे शक्य झाले नाही, हतबल पित्याने संपवलं जीवन
12
अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटातून मिळाली प्रेरणा; फुटपाथवरुन सुरू झाला प्रवास, आता बनले व्यवसाय क्षेत्रातील 'शहंशाह'
13
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाचे राहुल गांधींना खडे बोल  
14
बीएसएनएलने आणला १ रुपयांत फ्रिडम प्लॅन! ३० दिवस डेटा, कॉलिंग अन्... मोफत...
15
“सप्टेंबरमध्ये देशात मोठ्या राजकीय घडामोडी”; संजय राऊतांचे भाकित, म्हणाले, “RSS बैठकीत...”
16
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
17
पाणी पाकिस्तानची पाठ सोडेना! उन्हाळ्यात पाणी प्यायला मिळेना, पावसाळ्यात महापूर
18
"मी स्किन व्हाइटनिंग सर्जरी केलेली नाही तर...", काजोलने सांगितलेलं तिच्या फेअरनेसचं रहस्य
19
Video - बँड-बाजा अन् शेवटचा निरोप! गाव रडलं पण 'तो' मित्राच्या अंत्ययात्रेत आनंदाने नाचला, कारण...
20
Lunchbox Recipe: परवलाचं चमचमीत भरीतही होऊ शकतं, कधी ट्राय केलंय का? पहा सोप्पी रेसिपी

या भारतात बंधूभाव नित्य वसू दे...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2020 00:18 IST

नाशिक : जिल्ह्यात स्वातंत्र्य दिनानिमित्त शाळा, महाविद्यालये तसेच शैक्षणिक संस्थाच्या वतीने विविध कार्यक्रम घेण्यात आले.

ठळक मुद्देस्वातंत्र्यदिनाचा उत्साह : जिल्हाभरात विविध सामाजिक, शैक्षणिक संस्थामध्ये ध्वजारोहण; शासकीय कार्यालयांमध्ये व्यसनमुक्तीचा संकल्प

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : जिल्ह्यात स्वातंत्र्य दिनानिमित्त शाळा, महाविद्यालये तसेच शैक्षणिक संस्थाच्या वतीने विविध कार्यक्रम घेण्यात आले.आर्मस्ट्राँग साखर कारखाना मालेगाव : तालुक्यातील दाभाडी येथील आर्मस्ट्राँग साखर कारखाना येथे ज्येष्ठ कामगार अरूण अहिरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. कर्मवीर भाऊसाहेब हिरे पुतळ्यास सर्जेराव निकम यांनी पुष्पहार अर्पण केला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास सुरक्षा अधिकारी संदीप जाधव यांनी पुष्पहार अर्पण केला.वाके ग्रामपंचायतवाके : ग्रामपंचायतीचे ध्वजारोहण सरपंच श्रीमती भागाबाई बच्छाव यांच्या हस्ते, विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीचे ध्वजारोहन संगिता बच्छाव यांचेहस्ते तर जिल्हा परिषद शाळेत सैन्य दलातील जवान समाधान बच्छाव व मोठाभाऊ बच्छाव यांच्या हस्ते करण्यात आले.पाटणे सोसायटीपाटणे : येथे ग्रामपंचायतीत सरपंच राहुलाबाई अहिरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. पं. ज. नेहरू माध्यमिक विद्यालयाच्या प्रांगणात माजी पंचायत समिती सदस्य दौलत बागुल यांच्या हस्ते तर प्राथमिक शाळेत उपसरपंच जयश्री शेवाळे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. बस स्टॅण्ड येथे रंगनाथ शेवाळे व त्यांच्या पत्नी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. पाटणे सोसायटीचे ध्वजारोहण संस्थेच्या संचालिका शांताबाई वाघ यांच्या हस्ते करण्यात आले. श्री संत सावता महाराज चौकातील ध्वजारोहण आरोग्य सेवक अरूण पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.चौकटपाडे ग्रामपंचायतचौकटपाडे : येथे ग्रामपंचायतीत माजी सैनिक माणिक पारखे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे रवींद्रं गुडघे व प्रदीप पारखे यांच्या हस्ते ध्वजपूजन आणि ध्वजारोहण करण्यात आले. सरपंच अनिरूद्ध पारखे यांच्याकडून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथील मुलांना वही व पेनचे वाटप करण्यात आले. तसेच लोकांना करपट्टी भरण्यासाठी प्रोत्साहित केले.रावसाहेब थोरात विद्यालय, जानोरीजानोरी : येथील कर्मवीर रावसाहेब थोरात विद्यालयात स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात आला. अध्यक्षस्थानी कादवाचे संचालक शहाजी सोमवंशी होते. प्रास्ताविक प्राचार्य विजय म्हस्के यांनी केले.ध्वजारोहण माजी सैनिक सर्जेराव देशमुख यांनी केले, तर स्काउट-गाइडचे ध्वजारोहण शालेय समितीचे अध्यक्ष सुरेश कळमकर यांनी केले. यावेळी विलास पाटील, रामराव पाटील, नंदकुमार डिंगोरे, संतोष निकम, रंगनाथ घोलप, सुधा सोमवंशी, डॉ.चंद्रकांत पाटील, शांताराम मौले, जी. एम. गायकवाड, एल. टी. गुरुजी, सायली गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते. संगीतशिक्षक दिलीप पागेरे व गीत मंचने राष्ट्रगीत, ध्वजगीत व देशभक्तिपर गीते सादर केली.कार्यक्र मास पर्यवेक्षक निर्मला शिंदे, मुख्याध्यापक सोनाली देशमुख, नंदू पाटील, प्रदीप जाधव, अशोक गायकवाड, निवृती आहेर, शिवाजी शिंदे, उत्तम हाडोळे, नितीन जाधव, वसंत पगार, प्रमोद सोनवणे, योगेश मोगल, ज्ञानेश्वर भवर, अविनाश पालवी, मंगेश वाळके, तुषार गिते, नंदू घोटेकर, छाया शिरसाठ, मनीषा पवार, आदी उपस्थित होते.

टॅग्स :Independence Dayस्वातंत्र्य दिनMalegaonमालेगांव