नाशिक : मतदार पुनरीक्षण मोहिमेंर्तगत मतदान केंद्र अधिकारी (बीएलओ) रविवारी मतदारांच्या सोयीसाठी आपापल्या मतदार केंद्रांवर उपस्थित होते. मात्र याबाबत फारशी माहिती दिली न गेल्याने किंवा मतदारांमध्ये असलेल्या उदासीनतेमुळे केंद्रांवर मतदार फिरकलेच नसल्याचे चित्र दिसून आले. काही ठिकाणी तुरळक मतदारांनी अर्ज नेले असले तरी हे प्रमाण खूपच कमी असल्याचे दिसून आले. वडाळा-जुने नाशिकमध्ये अत्यल्प प्रतिसादमतदार पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत आज वडाळागाव-जुने नाशिक परिसरातील मतदान केंद्रांवर दुपारपासून बीएलओ कर्मचारी मतदार याद्या व विहित अर्जाचे नमुने घेऊन दाखल झाले होते; मात्र नागरिकांचा अत्यल्प प्रतिसाद लाभल्याने बीएलओंचाही हिरमोड झाला. पुनरीक्षण कार्यक्रमाबाबत काही लोकप्रतिनिधींनी सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रसार करण्याचा प्रयत्न केला; मात्र हा प्रयत्न तोकडा पडल्याचे चित्र वडाळा-जुने नाशिकसह संपूर्ण शहरात बघावयास मिळाले.वडाळागावातील केबीएच विद्यालय या केंद्रावर दुपारी साडेबारा वाजेपर्यंत बीएलओ दाखल झालेले नव्हते. तसेच मनपा शाळा केंद्रावरही दुपारी एक वाजेपर्यंत एकच बीएलओ कर्तव्य बजावताना दिसून आले. जुने नाशिक परिसरातील कथड्यामधील मनपा सुमंत नाईक उर्दू शाळा, नागझिरी मनपा शाळा, चव्हाटा येथील रंगारवाडा मनपा शाळा, बडी दर्गा मनपा शाळा आदि मतदान कें द्रांवर सकाळी दहा वाजेपासून बीएलओ हजर होते; मात्र मतदारांची त्यांना तासन्तास प्रतीक्षा करावी लागत होती. एकूणच शहरासह उपनगरांमध्ये शासनाकडून तसेच महापालिकेकडून मतदार पुनरीक्षण कार्यक्रमाबाबत जनजागृती व्यापक प्रमाणात करण्यात आली नसल्याचे यावरून स्पष्ट झाले.
बीएलओ केंद्रांवर मतदारांची पाठ
By admin | Updated: October 11, 2015 22:24 IST