शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
2
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
3
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
4
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
5
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
6
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
7
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
8
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
9
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
10
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
11
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
12
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
13
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
14
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
15
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
16
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
17
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'
18
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला
19
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
20
Kareena Kapoor : "मी २ महिने शाहिदच्या मागे लागलेली, खूप सारे SMS करायची, मी पहिली व्यक्ती होती, जी..."

रिक्षाचालकांना मिळणार वाहतूक नियमांचे धडे

By admin | Updated: November 27, 2015 22:34 IST

रिक्षाचालकांना मिळणार वाहतूक नियमांचे धडे

नाशिक : सुरक्षित वाहन कसे चालवावे यासाठी शाळकरी मुलांना प्रशिक्षण देणाऱ्या ‘नाशिक फर्स्ट’ या संस्थेच्या वतीने आता रिक्षाचालकांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. शनिवारी (दि. २८) दुपारी ३ वाजता या प्रशिक्षणवर्गाचा शुभारंभ पोलीस आयुक्त एस. जगन्नाथन यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.तिडके कॉलनीतील तूपसाखरे लॉन्सच्या पाठीमागील बाजूस महापालिका आणि नाशिक फर्स्ट या संस्थेच्या वतीने ट्रॅफिक चिल्ड्रेन पार्क साकारण्यात आला आहे. बालवयातच मुलांना वाहतूक नियमाचे धडे मिळावे यासाठी राबविण्यात आलेल्या या उपक्रमात आत्तापर्यंत तीन हजार मुलांना प्रशिक्षण देण्यात आले आहे, अशी माहिती नाशिक फर्स्टचे अभय कुलकर्णी यांनी दिली. या प्रशिक्षणासाठी शाळा मोठ्या प्रमाणात इच्छुक असल्या तरी आता दर शनिवारी आणि रविवारी सार्वजनिक वाहतूक करणाऱ्यांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. प्रदीप म्हसकर यांच्या सहकार्याने सुरक्षित वाहतुकीसंदर्भातील माहितीपट उपलब्ध असून, तोही संंबंधितांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यामुळे आता पहिल्या टप्प्यात रिक्षाचालकांना प्रशिक्षण देण्यात येणार असून दोन दिवसांत ६० याप्रमाणे वर्ग घेतले जातील, तर त्यानंतर बसचालक आणि ट्रकचालकांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. (प्रतिनिधी)