नाशिक : मोदी लाटेत सत्तेवर आलेल्या शहरातील आमदारांना अद्यापही मंत्र्यांच्या स्वागताचा ‘प्रोटोकॉल’ समजला नसून शासकीय दौरा सोडाच, परंतु पक्षपातळीवर आयोजित केलेल्या दौऱ्यातही ते उपस्थित राहत नसल्याने त्यांच्यावर पक्षाचा काही वचक आहे की नाही याबाबत चर्चा सुरू आहे. संस्कारांचा टेंभा मिरवणाऱ्या या पक्षातील पदाधिकाऱ्यांना आणि लोकप्रतिनिधींना पक्षातील शिस्तीचे धडे देण्याची गरज निर्माण झाल्याचे त्यातून दिसून येत असून आदिवासी राज्यमंत्री आले असताना केवळ एकच महिला आमदार उपस्थित असल्याने बाकीचे आमदार आणि आदिवासी भागातले भाजपाचे खासदार अनुपस्थित राहिल्याने राज्यमंत्र्यांच्या या दौऱ्याकडे पदाधिकाऱ्यांनी पाठ फिरवली की त्यांना त्याचे निमंत्रणच गेले नाही? असा प्रश्न त्यातून निर्माण झाला आहे. (प्रतिनिधी)
राज्यमंत्र्यांच्या दौऱ्याकडे आमदारांची पाठ
By admin | Updated: August 7, 2015 22:47 IST