हरसूल : ‘येऊन येऊन येणार कोण, कांचनशिवाय आहेच कोण?’, ‘निखिल भाऊ तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है’, मनीषा- मनीषा’ अशा अनेक घोषणांनी हरसूल जिल्हा परिषद शाळेचा परिसर दणाणून गेला होता व चिमुकल्यांनी मोठ्यांना लाजवेल अशा थाटात प्रचार केला. आपल्या मतदानाचे आवाहन केले. गुप्तता पाळत विद्यार्थ्यांनी मतदान केले. चौथ्या दिवशी मुख्यध्यापक अर्जुन भोये यांनी निकाल जाहीर केला. कोणाला किती मते मिळाली ते जाहीर करण्यात आले. आणि शाळेला मिळाले नवेकोरे मंत्रिमंडळ. विद्यार्थ्यांनी जल्लोष करत आनंदोत्सव साजरा केला. निवडणुकीसाठी नामांकन करण्यापासून ते प्रत्यक्ष मतदान करेपर्यंत विविध टप्प्यांवर काम करण्यासाठी विद्यार्थ्यांना उद्धव पवार, मनोहर राऊत, त्र्यंबक महाले, काका कवडे, अशोक कामडी, पवार, दळवी, उषा पगारे, स्मिता पाटील, कविता लहारे, माया चोधरी, आनंद मगर, गणेश बारगजे यांनी मार्गदर्शन केले .