शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

ट्रकचालकांना वाहतूक नियमांचे दिले धडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2018 00:57 IST

शहरातील आडगावस्थित ट्रक टर्मिनलमध्ये वाहतूक सुरक्षा अभियांनातर्गत नाशिक ट्रान्सपोर्ट असोसिएशन आणि परिवहन विभागाच्या माध्यमातून मालट्रकचालकांना वाहतूक नियमांचे धडे देण्यात आले.

नाशिक : शहरातील आडगावस्थित ट्रक टर्मिनलमध्ये वाहतूक सुरक्षा अभियांनातर्गत नाशिक ट्रान्सपोर्ट असोसिएशन आणि परिवहन विभागाच्या माध्यमातून मालट्रकचालकांना वाहतूक नियमांचे धडे देण्यात आले. यावेळी वाहतूक नियमांच्या पोस्टरचे अनावरण करून परिवहन विभागाचे उपप्रादेशिक अधिकारी विनय आहिरे यांनी ट्रकचालकांना अपघात टाळण्यासाठी वाहतूक नियमांची माहिती देऊन नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले.  यावेळी बोलताना उपप्रादेशिक अधिकारी विनय आहिरे म्हणाले की, दिवसेंदिवस रस्ते अपघाताचे प्रमाण वाढत असून, त्याला आळा घालण्याची गरज आहे. यासाठी ट्रकचालकांची भूमिका ही महत्त्वाची असून, अपघात टाळण्यासाठी ट्रकचालकांनी नियमांचे काटेकोर पालन करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच प्रवास करत असताना चालकांनी हॉर्नचा वापर कमी करून ध्वनिप्रदूषण टाळण्यासाठी मदत करावी, असे आवाहनदेखील त्यांनी केले. तसेच परिवहन विभागाकडून वाहतूक नियमांच्या पुस्तिकांचे वाटपदेखील करण्यात आले.  यावेळी नाशिक ट्रान्सस्पोर्टकडून नियमांच्या स्टिकरचे अनावरण करून त्याचे वाटप करण्यात आले. परिवहन विभागाचे निकम, धात्रक, ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे उपाध्यक्ष राजेंद्र फड, सेक्रेटरी सुभाष जांगडा, विनोद शर्मा, उपाध्यक्ष शरद बोरसे, महेंद्रसिंग राजपूत, संजय राठी, सुनील अहिरे, अमोल शळके, मनोज उदावंत, बापू ताकटे, लक्ष्मण पाटील, मुन्ना भालेराव आदी उपस्थित होते.

टॅग्स :Rto officeआरटीओ ऑफीस