शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

थंडीचा कडाका कमी अन‌् धुके जास्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 04:41 IST

मागील चार दिवसांपासून नाशिककरांना ढगाळ हवामानासह बेमोसमी पावसाच्या हलक्या सरींचाही सामना करावा लागत होता. सकाळ-संध्याकाळ पाऊस हजेरी लावत असल्याने ...

मागील चार दिवसांपासून नाशिककरांना ढगाळ हवामानासह बेमोसमी पावसाच्या हलक्या सरींचाही सामना करावा लागत होता. सकाळ-संध्याकाळ पाऊस हजेरी लावत असल्याने बळीराजा चिंतेत सापडला होता अन‌् वातावरणात कमालीचा गारठा निर्माण झाला होता. यामुळे नाशिककरांना हुडहुडी भरली होती. मंगळवारप्रमाणे बुधवारीही पहाटे अचानक धुक्यात प्रचंड वाढ झालेली दिसून आली. सकाळी साडेसहा वाजतापासून साडेआठ वाजतापर्यंत वातावरणात प्रचंड धुके अन‌् दवबिंदूंचा वर्षाव होत होता. संपूर्ण गोदाकाठ धुक्यात हरविला होता. जुने नाशिकपासून पुढे पंचवटी, मेरी, म्हसरुळ, मखमलाबाद, हनुमानवाडी, गंगापूररोड, आनंदवली, हिरावाडी, अमृतधाम, आडगाव या भागात सर्वाधिक दाट धुके पसरल्याचे चित्र पहावयास मिळाले. पेठरोडवरील हवामान केंद्राकडून मंगळवारी सकाळी ९८ टक्के तर बुधवारी थेट १०० टक्के इतकी आर्द्रता मोजली गेली.

दरम्यान, सकाळी नऊ वाजेपासून सूर्यप्रकाश पडत असल्याने मागील दोन दिवसांपासून वातावरणातील गारठा कमी झाला आहे. पुढील काही दिवस दररोज पहाटे शहरात धुक्याचे प्रमाण राहणार आहे.

--इन्फो--

वाढता वाढे आर्द्रता...

नाशिकमध्ये मागील तीन ते चार दिवसांपासून सकाळच्या सुमारास आर्द्रतेचा आलेख चढता आहे. १२ तारखेपासून सकाळी आर्द्रतेचे प्रमाण वाढतच राहिल्याचे दिसते. १ टक्क्यांवरून बुधवारी आर्द्रता थेट शंभर टक्क्यांपर्यंत जाऊन पोहोचली. यामुळे शहरात दररोज प्रचंड धुके दाटून येत आहे.

----कोट---

हिवाळा ऋतु अन‌् किमान तापमानात होणारी घट अन‌् हवेतील बाष्प व आर्द्रतेचे वाढलेले प्रमाण यामुळे अचानक धुके वाढले. रविवारी संध्याकाळी कोसळलेल्या सरींमुळेही धुक्याला निमंत्रण मिळाले. सूर्यदर्शन घडल्यामुळे ढग वितळू लागले आहे. जसेजसे आकाश निरभ्र होत जाईल, तशी थंडीची तीव्रता यापुढे अधिक वाढत जाणार आहे. डिसेंबरअखेरीस नाशिक शहर व निफाड, मालेगावात किमान तापमानाचा पारा ५अंश सेल्सिअस किंवा त्यापेक्षाही कमी होण्याची शक्यता आहे.

-सुनील काळभोर, हवामान तज्ज्ञ, नाशिक केंद्र प्रमुख.