शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषदेच्या ३०२ शाळांमध्ये २० पेक्षाही कमी पटसंख्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2021 04:16 IST

नाशिक : जिल्हा परिषदेच्या शाळांची पटसंख्या वाढण्यासाठी शिक्षण विभागाकडून विविध उपक्रम राबविण्यात येत असले तरी जिल्ह्यातील ३०२ शाळांची पटसंख्या ...

नाशिक : जिल्हा परिषदेच्या शाळांची पटसंख्या वाढण्यासाठी शिक्षण विभागाकडून विविध उपक्रम राबविण्यात येत असले तरी जिल्ह्यातील ३०२ शाळांची पटसंख्या २० पेक्षा कमी आहे. अशा एकूण ३०२ अशा शाळा बंद तर होणार नाही ना, अशी भीती शिक्षकांसह विद्यार्थी व पालकांमध्ये निर्माण झाली आहे. मात्र नाशिक जिल्ह्यातील या शाळा अतिदुर्गम आणि परिसरात अन्य शाळा नसलेल्या भागात असल्याने यातील बहुतांश शाळा सुरूच राहणार असून, शिक्षण विभागाने अद्याप कोणत्याही शा‌ळेचे समायोजन केलेले नसल्याची माहिती शिक्षण विभागातील सूत्रांनी दिली आहे.

जिल्हा परिषदेच्या शाळातील विद्यार्थी पटसंख्या वाढविण्यासाठी शासनाकडून विविध योजना राबविण्यात येतात. मात्र, इंग्रजी माध्यमाच्या शाळांकडे वाढत्या कलामुळे झेडपीच्या प्राथमिक शाळांमधील पटसंख्या कमी होत आहे. त्यातच कोरोनामुळे ऑनलाइन शिक्षणपद्धती सुरू झाली आहे. जिल्हा परिषदेच्या शाळांच्या तुलनेत खासगी शाळा याबाबतीत पुढे आहेत. त्यामुळे एकीकडे इंग्रजी माध्यमांच्या शाळा व त्यांची पटसंख्याही वाढत असताना दुसरीकडे जिल्हा परिषद शाळेत कुठे १०, तर २० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्यामुळे राज्य शासनाने सर्व जिल्हा परिषद शाळांच्या पटसंख्येबाबत अहवाल मागितला होता. यात नाशिक जिल्ह्यातील ३०२ शाळांमध्ये २०पेक्षा कमी पटसंख्या असल्याचे समोर आले आहे. अशा शाळांच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करीत नव्या सत्रात या शाळांचे समायोजन तर केले जाणार नाही ना, असा प्रश्न विद्यार्थी, पालक व शिक्षकांना भेडसावत असताना नाशिक जिल्ह्यातील २० पटसंख्येपेक्षा कमी विद्यार्थी असलेल्या बहुतांश शाळा अतिदुर्गम व परिसरात दुसरी शाळा नसलेल्या भागात असल्या भागात असल्याने या शाळा समायोजनाच्या निकषांना अनुसरून बंद करता येणार नाही. त्याचप्रमाणे शिक्षण विभागाकडूनही या शाळा बंद करण्यासंदर्भात अद्याप कोणतीही कार्यवाही झालेली नसल्याने अतिदुर्गम भागातील विद्यार्थी व पालकांना दिलासा मिळाला आहे.