शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

बिबट्या मृतावस्थेत आढळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2018 01:02 IST

डोंगराळे शिवारात एका शेतात एक ते दीड वर्षाची मादी बिबट्या मृतावस्थेत आढळून आली आहे. या घटनेची माहिती वनविभागाच्या अधिकाऱ्यांना कळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून अंत्यविधी करण्यात आला.

आझादनगर : तालुक्यातील डोंगराळे शिवारात एका शेतात एक ते दीड वर्षाची मादी बिबट्या मृतावस्थेत आढळून आली आहे. या घटनेची माहिती वनविभागाच्या अधिकाऱ्यांना कळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून अंत्यविधी करण्यात आला. उपाशीपोटी असल्याने त्याचा मृत्यू झाल्याचा अंदाज पशुसंवर्धन अधिकारी डॉ. जावेद खाटीक व वनपरिक्षेत्र अधिकारी व्ही. डी. कांबळे यांच्याकडून वर्तविण्यात आला.शुक्रवारी (दि.१०) रात्री तालुक्यातील डोंगराळे शिवारातील कारभारी शांताराम पगारे यांच्या गट क्रमांक ६४ मधील शेतात बिबट्या मृतावस्थेत असल्याची माहिती डोंगराळे येथील सतीश पितांबर भदाणे या शेतकºयाने वनविभागास दिली. घटनेची माहिती मिळताच वनपरिक्षेत्र अधिकारी यांच्या वनपाल व्ही. एस. बोरसे, भानुदास सूर्यवंशी, वनरक्षक अशोक शिंदे, देसाई, गोयेकर, हिरे व अहिरे यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. मृत बिबट्याचा पंचनामा करीत रात्री १२ वाजेच्या सुमारास लोणवडे रोपवाटिका केंद्र येथे आणण्यात आले होते.आज दुपारी १२ वाजता वनविभागाचे अधिकारी, वन्यजीव अभ्यासक सतीश खरे यांच्या उपस्थितीत डॉ. जावेदखाटीक, शिवाजी गुडघे यांनी पंचनामा  करीत शवविच्छेदन केले. यात प्रथमदर्शनी भुकेमुळे त्याचा मृत्यू झाल्याचा कयास वर्तविण्यात आला असला तरी न्यायवैधक चाचणीच्या अहवालानंतरच मृत्यूचे कारण समोर येणार असल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी व्ही. डी. कांबळे यांनी दिली.

टॅग्स :leopardबिबट्याMalegaonमालेगांव