शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
6
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
7
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
8
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
9
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
10
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
11
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
12
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
13
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
14
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
15
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
16
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
17
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
18
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
19
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
20
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

साकोरेतील नागरिकांना बिबट्याची दहशत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2020 00:58 IST

ओझर : येथून जवळच असलेल्या साकोरे मिग गावातील नागरिक सध्या बिबट्याच्या दहशतीखाली जीवन जगत आहेत. त्यामुळे संबंधित विभागाने यावर ठोस उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे.

ओझर : येथून जवळच असलेल्या साकोरे मिग गावातील नागरिक सध्या बिबट्याच्या दहशतीखाली जीवन जगत आहेत. त्यामुळे संबंधित विभागाने यावर ठोस उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे.निफाड तालुक्यातील सर्वाधिक द्राक्ष निर्यात करणाऱ्या साकोरे मिग गावाची लोकसंख्या चार हजाराच्या आसपास असून, गावाला लागून एचएएलचे कंपाउण्ड आहे. त्यात एचएएलची शेकडो एकर जागा पडित असून, त्यात अनेक हिंसक जनावरांचे वास्तव्य आहे. जनावरांच्या सीमा या कंपाउण्डच्या आत असताना त्याला आता सार्वजनिक ठिकाणी लोकांच्या अंगणात जागा मिळू लागली आहे. त्याचा सर्वाधिक फटका साकोºयाच्या ग्रामस्थांना बसत आहे. बिबटे, रानडुकरे हे आता एचएएलच्या भिंतीवरून उड्या घेत थेट गावात शिरत आहे. शिवारात असलेल्या शेतकऱ्यांच्या पाळीव प्राण्यांवर हल्ला करणे सुरू केले आहे. वनविभागाने पिंजरे लावून उपाययोजना केली असली तरी बिबट्याचा बंदोबस्त झालेला नाही. लावलेल्या पिंजºयाशेजारून बिबट्या गेल्याचे सीसीटीव्ही फुटेजवरून निष्पन्न झाल्याने नागरिकांचे आता घराबाहेर पडणे मुश्कील होऊन बसले आहे.निफाड तालुक्यात गोदाकाठ भागातील सायखेडा, चांदोरी, करंजगावसह परिसरातील गावांमध्ये बिबट्याने धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे नागरिकांसह शेतकरी, मजुरांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे. ऊस शेतीमुळे बिबट्या केव्हा हल्ला करेल याची शाश्वती नसल्याने गावापासून दूर अशा मळ्यांमध्ये वस्ती करून राहणाºया शेतकºयांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वनविभागाने तातडीने पिंजरे बसवावे, अशी मागणी गोदाकाठ परिसरातील शेतकºयांकडून होत आहे.------------------एचएएलच्या े संरक्षक भिंतीला अनेक ठिकाणी छिद्रे तर कुठे वरतून तारी गायब झाल्याने बिबट्यासारखे हिंस्र प्राणी गावात येतात. ग्रामस्थांचे जगणे मुश्कील होऊन बसले आहे. एचएएलने संरक्षक भिंत त्वरित दुरु स्त करावे.- अनिल बोरस्ते,उपसरपंच, साकोरे े(मिग).

टॅग्स :Nashikनाशिक