शहरं
Join us  
Trending Stories
1
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
2
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
3
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
4
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
5
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
6
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
7
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
8
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
9
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
10
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
11
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
12
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
13
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
14
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
15
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
16
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
17
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
18
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
19
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
20
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
Daily Top 2Weekly Top 5

विहिरीतून बिबट्याने स्वत:च करून घेतली सुटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2021 01:15 IST

भक्ष्याच्या शोधात भटकंती करताना अंदाजे आठ ते दहा महिन्यांचा बिबट्या पाण्याने भरलेल्या एका विहिरीत कोसळला. पूर्व वन विभागाच्या हद्दीतील सुरगाणा वनपरिक्षेत्रातील बुबळी घाट येथे ही घटना घडली. 

ठळक मुद्देसुरगाणा तालुक्यातील घटना लाकडी शिडीच्या साहाय्याने सुखरूप पलायन

नाशिक : भक्ष्याच्या शोधात भटकंती करताना अंदाजे आठ ते दहा महिन्यांचा बिबट्या पाण्याने भरलेल्या एका विहिरीत कोसळला. पूर्व वन विभागाच्या हद्दीतील सुरगाणा वनपरिक्षेत्रातील बुबळी घाट येथे ही घटना घडली. घटनेची माहिती मिळताच वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी एक लाकडी शिडी दोरीच्या साहाय्याने कर्मचाऱ्यांनी विहिरीत सोडली. काही वेळेतच चपळ बिबट्याने सुटकेसाठीचा हा मार्ग ओळखला अन‌् त्या अधारे शिडीवरून सुरक्षितपणे बाहेर येत धूम ठोकली. बोरगावपासून काही अंतरावर असलेल्या बुबळी चिराई घाट परिसरातील एका विहिरीत बिबट्या मध्यरात्रीच्या सुमारास कोळला. बिबट्या आपला जीव वाचविण्यासाठी पहाटेपासून विहिरीत  धडपड करत होता. विहिरीतून आपली सुटका कशी करता येईल, या प्रयत्नात तो पाण्यातच चकरा घालत डरकाळ्या फोडू लागला. त्याच्या डरकाळ्यांचा आवाज सकाळच्या सुमारास शेतकऱ्यांच्या कानी पडला. यावेळी त्यांनी विहिरीच्या दिशेने धाव घेत आतमध्ये डोकावून बघितले असता बिबट्याची विहिरीत धडपड सुरू असल्याचे दिसले. गावकऱ्यांनी तत्काळ वन विभागाच्या दक्षता पथकाला माहिती कळविली. काही वेळेतच सुरगाणा वनपरिक्षेत्रातील वनपाल, वनरक्षक घटनास्थळी दाखल झाले. विहिरीचा परिसर पूर्णपणे रिकामा करत बघ्यांची गर्दी वन कर्मचाऱ्यांनी दूर केली....अन‌् बिबट्याचा जीव वाचलावन कर्मचाऱ्यांनी एक लाकडी शिडी विहिरीच्या कठड्यावरून आतमध्ये सोडली अन् शिडी दोरीच्या सहाय्याने भक्कम बांधून ठेवत तेथून काढता पाय घेतला.  बुद्धिमान वन्य प्राण्यांपैकी एक समजल्या जाणाऱ्या आणि कोणत्याही परिस्थतीशी त्वरित स्वत:ला जुळवून घेण्यात तरबेज असलेल्या या चपळ बिबट्याने ती शिडी अनेकदा पायाने हलवून तपासली. त्यानंतरच शिडीच्या लाकडी पायऱ्यांवर पाय टाकून वर येण्यास सुरुवात केली. अखेर काही वेळेतच बिबट्याने विहिरीतून सुखरूपपणे बाहेर आला. काही मिनिटे कठड्यावर बसत भिजलेले शरीर झटकत जंगलाच्या दिशेने झेप घेत पलायन केले. 

टॅग्स :Nashikनाशिकleopardबिबट्या