शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
4
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
5
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
6
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
7
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
8
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
9
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
10
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
11
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
12
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
13
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
14
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
15
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
16
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
17
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
18
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
19
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
20
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
Daily Top 2Weekly Top 5

मानोलीमध्ये बिबट्या जेरबंद

By admin | Updated: July 28, 2016 01:04 IST

मानोलीमध्ये बिबट्या जेरबंद

 नाशिक : दरी-मातोरीपासून पाच ते सहा किलोमीटर अंतरावर असलेल्या मानोली गावामध्ये बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास पिंजऱ्यात पाच वर्ष वयाचा बिबट्या (नर) जेरबंद झाला. गेल्या महिनाभरापासून या भागात बिबट्या नागरिकांना विविध ठिकाणी रात्री-मध्यरात्री, पहाटे दर्शन देत होता. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. बिबट्या एकापेक्षा अधिक असल्याचा अंदाज रहिवाशांनी व्यक्त केला होता; मात्र नागरिकांच्या तक्रारीवरून वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी संबंधित ठिकाणी भेट देऊन पाहणी केली. दरम्यान, काही ठिकाणी शेतांमध्ये बिबट्यांच्या पावलांची ठसे आढळून आले. यावेळी येथील एका शेताच्या बांधालगत वनविभागाने शास्त्रीय पद्धतीने पिंजरा लावला. या पिंजऱ्यात बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास भक्ष्य शोधताना पिंजरा अखेर जेरबंद झाला आणि रहिवाशांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. याबाबतची माहिती नागरिकांनी वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी सकाळी दिली. त्यानंतर कर्मचाऱ्यांनी पिंजऱ्याच्या ठिकाणी जाऊन सुरक्षितरीत्या पिंजरा रेस्क्यू केला. रहिवाशांनी यावेळी कर्मचाऱ्यांकडे आणखी एक पिंजरा लावण्याची मागणी लावून धरली होती. कारण या भागात आणखी बिबट्यांचा संचार असल्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे जोपर्यंत दुसरा पिंजरा येथे लावला जात नाही तोपर्यंत पिंजरा हलवायचा नाही, अशी आक्रमक भूमिका गावकऱ्यांनी घेतली होती. त्यामुळे वनविभागाच्या कर्मचाऱ्यांची पंचाईत झाली; अखेर कर्मचारी व अधिकाऱ्यांनी गावकऱ्यांची समजूत काढत पिंजरा अन्य ठिकाणांहून वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या परवानगीनंतर पिंजरा आणता येईल, असे सांगून लवकरच पिंजरा लावला जाणार असल्याचे आश्वासन दिले. पशु वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय महाजन यांनी जेरबंद केलेल्या बिबट्याची वैद्यकीय तपासणी क रून प्रकृती उत्तम असल्याचे सांगितले. बिबट्याला दोन दिवस सुरक्षित ठिकाणी ठेवण्यात आले असून त्यानंतर जिल्ह्यातील नैसर्गिक अधिवासात बिबट्याला मुक्त करण्यात येणार असल्याची माहिती वनविभागाच्या सूत्रांनी दिली आहे. (प्रतिनिधी)