शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

पिंजऱ्यावर धडका देत बिबट्याने गमावले सुळके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2020 04:09 IST

इगतपुरी वनपरीक्षेत्रातील पिंपळगाव मोर गावाच्या शिवारात १ डिसेंबर रोजी पहाटे पिंजऱ्यात जेरबंद झालेला बिबट्या हा सुमारे साडेचार वर्षे वयाचा ...

इगतपुरी वनपरीक्षेत्रातील पिंपळगाव मोर गावाच्या शिवारात १ डिसेंबर रोजी पहाटे पिंजऱ्यात जेरबंद झालेला बिबट्या हा सुमारे साडेचार वर्षे वयाचा असून, हा बिबट्या जेरबंद झाल्यापासून अत्यंत आक्रमक आहे. जवळपास मागील एक महिन्यापासून लहानशा ट्रॅप पिंजऱ्यात बिबट्या कैदेत असल्याने तो अधिकच चिडखोर बनला आहे. या बिबबट्याने पिंजऱ्याच्या लोखंडी जाळीवर स्वत:चे डोके आदळून कपाळही काही दिवसांपूर्वी फोडून घेतले होते. उपचारानंतर ती जखम भरून आलीस असली, तरी बिबट्याने मात्र त्याचे दात या धडकांमध्ये कायमचे गमावले आहेत. एकूणच या लहानशा पिंजऱ्यात अडकल्यापासून बिबट्याची अधिकच वाताहत होताना दिसत आहे. या बिबट्याला नैसर्गिक अधिवासात मुक्त करणे आता कदापि शक्य नाही. किंबहुना, ते मानवी जीवनासाठीही सुरक्षित नसल्यामुळे पुनर्वसन केंद्रात बिबट्याचे पुढील संगोपन केले जाणार आहे. मात्र, या बिबट्याचा बोरीवली किंवा जुन्नरचा प्रवासाला पश्चिम वनविभागाकडून ‘हिरवा कंदील’ कधी मिळेल? याकडे आता वन्यजीवप्रेमींचे लक्ष लागले आहे.

---इन्फो---

बोरीवली अन‌् माणिकडोह ‘हाउसफुल्ल’

बोरीवलीच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील, तसेच जुन्नर तालुक्यातील माणिकडोह बिबट रेस्क्यू सेंटर सध्या हाउसफुल्ल झाले आहेत. बोरीवलीची एकूण क्षमता २४ बिबट्यांची असली, तरीही त्यांना संगोपनाकरिता काही पिंजरे रिकामे ठेवावे लागतात. त्यामुळे १८ बिबटे ठेवण्यापर्यंत तेथे बिबट्यांना स्वीकारले जाते. सध्या येथे १५ बिबटे असून, यामध्ये नाशिकचे तीन आहे. या ठिकाणी वैद्यकीय सोईसुविधाही तोकड्या आहेत. त्या तुलनेत माणिकडोह केंद्र मोठे असून, येथे ३६ बिबटे एकाच वेळी ठेवता येऊ शकतात आणि या केंद्रासाठी स्वतंत्र यंत्रणा व मनुष्यबळ कार्यरत आहे. मात्र, येथे सध्या ३४ बिबटे आहेत.

----कोट---

लहानशा पिंजऱ्यात बिबट्याला अधिक दिवस ठेवणे हे त्याच्या जिवावर बेतण्यासारखे आहे. जर बिबट्याने दात गमावले असतील, तर त्याचे पुढील आयुर्मानही एक प्रकारे कमी झाले आहे. या बिबट्याला अधिक आक्रमक होण्यास या लहान पिंजऱ्यातील कैद भाग पाडत आहे. त्यामुळे त्याला जुन्नर किंवा बोरीवलीला लवकर स्थलांतरित करणे गरजेचे आहे. या बिबट्याला कायमस्वरूपी आता पिंजऱ्यात ठेवणे हाच त्याच्यासाठी आणि मानवासाठी सुरक्षित पर्याय आहे. नाशिकला ‘रेस्क्यू सेंटर’ उभारले जावे, यासाठी २०१५ साली कृती आराखड्यात ही बाब प्रकर्षाने नमूद करण्यात आली आहे.

-विद्या अत्रेय, बिबट तज्ज्ञ, वाईल्ड लाइफ कॉन्झर्वेशन सोसायटी

---

फोटो आर वर २७बिबट्या नावाने सेव्ह.

--

स्पेशल स्टोरीचा टॅग वापरावा.