शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

बेलगाव कुºहे येथील पोल्ट्रीतून बिबट्या जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2019 23:47 IST

नांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्यातील बेलगाव कुºहे येथील लष्करी हद्दीजवळ असलेल्या माजी सरपंच संजय गुळवे यांच्या पोल्ट्री फार्ममध्ये अडकलेल्या बिबट्याला जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले आहे. चार तासांच्या रेस्क्यूनंतर बिबट्याला जेरबंद करण्यात यश आल्यानंतर वनकर्मचाऱ्यांसह ग्रामस्थांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.

ठळक मुद्देरेस्क्यू आॅपरेशन : चार तासांच्या अथक प्रयत्नानंतर वनविभागाला यश

नांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्यातील बेलगाव कुºहे येथील लष्करी हद्दीजवळ असलेल्या माजी सरपंच संजय गुळवे यांच्या पोल्ट्री फार्ममध्ये अडकलेल्या बिबट्याला जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले आहे. चार तासांच्या रेस्क्यूनंतर बिबट्याला जेरबंद करण्यात यश आल्यानंतर वनकर्मचाऱ्यांसह ग्रामस्थांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.बेलगाव कुºहेचे माजी सरपंच संजय गुळवे यांच्या पोल्ट्री फार्मच्या छतावर रविवारी सकाळी अकरा वाजेदरम्यान बिबट्या आढळून आला. येथील कामगारांनी बिबट्यास बघितले व ते घाबरून पळू लागले. दरम्यान बिबट्याच्या वजनाने पोल्ट्रीच्या छतावरील एक सिमेंट पत्रा फुटून बिबट्या शेडमध्ये पडला.पोल्ट्रीत बिबट्या असल्याची बातमी क्षणार्धात पसिरात तसेच गावात पोहोचली आणि बघ्यांनी बिबट्या पाहण्यासाठी गर्दी केली. गर्दी पाहून बिथरलेला बिबट्या पोल्ट्रीतून बाहेर पडण्यासाठी पळू लागला. बघ्यांच्या गर्दीवर डरकाळ्या फोडत धावत जाऊन पोल्ट्रीच्या संरक्षक जाळ्यांना धडक देऊ लागला. या धडकेत त्याच्या तोंडाला जखम झाली व रक्तही निघू लागले. अर्ध्या तासाच्या या थरारनाट्यानंतर दमलेला बिबट्या घाबरून बाजूला असलेल्या प्लॅस्टिक कागदाआड जाऊन बसला. या घटनेत शेडमध्ये असलेले हजार ते पंधराशे पक्षी घाबरून मृत्युमुखी पडले. यात गुळवे यांचे किमानपंधरा ते वीस हजारांचे नुकसान झाले आहे.घटनेची माहिती बेलगावचे सरपंच प्रा. नंदराज गुळवे यांनी वनविभागाला कळवली. वनविभागाचे वाडीवºहे बिटाचे वनपरिमंडल अधिकारी ओंकार देशपांडे व त्यांची पथक घटनास्थळी हजर झाले. त्यांनी परिस्थिती पाहून पिंजऱ्याची व्यवस्था केली. तसेच नाशिकच्या रेस्क्यू टीमला पाचारण केले. इगतपुरीचे वनपरिक्षेत्र अधिकारी रमेश डोमसे यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक वनविभागाचे वनाधिकारी एस. पी. थोरात, वनपाल पी. के. डांगे, वनपाल बी. जे. राव, वनरक्षक पी. साबळे, वाहक मज्जू शेख यांच्या चार तासांच्या अथक प्रयत्नानंतर रेस्क्यू आॅपरेशन राबवून बिबट्याला जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले.यावेळी सरपंच राजाभाऊ गुळवे, नंदराज गुळवे, संतोष गुळवे, अनिल गुळवे, उपसरपंच कोंडाजी गुळवे आदी नागरिक उपस्थित होते. गावातील पोल्ट्री फार्ममध्ये बिबट्या शिरल्याची बातमी कळताच घटनास्थळी धाव घेऊन वनविभागाला दूरध्वनीवरून माहिती दिली. वन अधिकाºयानीदेखील तातडीने दाखल होत बिबट्याला रेस्क्यू आॅपरेशनद्वारे जेरबंद केले. सुदैवाने मोठा अनर्थ टळला.- नंदराज गुळवे, सरपंच, बेलगाव कुºहे