निफाड : तालुक्यातील औरंगपूर येथे येवला वनविभागाने लावलेल्या पिंजºयात बिबट्या जेरबंद झाला आहे. हा बिबट्या एक वर्ष वयाचा आहे.मागील काही दिवसांपासून औरंगपूर येथे बिबट्याचा त्रास वाढला होता. त्यामुळे औरंगपूर येथे संजय इंदे यांच्या शेतात वनविभागाने शुक्रवारी (दि ९) पिंजरा लावला होता. शुक्रवारी रात्री बिबट्या पिंजºयात जेरबंद झाला. ही घटना वनविभागास कळवण्यात आली येवला वनविभागाचे सहाय्यक वनसंरक्षक कापसे, वनपरिक्षेत्र अधिकारी संजय भंडारी यांच्या मार्गदर्शनाखाली मनमाडचे वनपाल पी.एस. पाटील, वनपाल एम. एम. राठोड, विंचूरचे वनरक्षक विजय टेकणर, वनसेवक भय्या शेख आदींच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन जेरबंद बिबट्याला ताब्यात घेऊन पुढील कार्यवाही केली. १४ डिसेंबर २०१७ रोजी औरंगपूर येथे ३ वर्ष वयाच्या बिबट्यास जेरबंद करण्यात आले होते.
औरंगपूर येथे बिबट्या जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2018 00:30 IST
निफाड : तालुक्यातील औरंगपूर येथे येवला वनविभागाने लावलेल्या पिंजºयात बिबट्या जेरबंद झाला आहे. हा बिबट्या एक वर्ष वयाचा आहे. मागील काही दिवसांपासून औरंगपूर येथे बिबट्याचा त्रास वाढला होता. त्यामुळे औरंगपूर येथे संजय इंदे यांच्या शेतात वनविभागाने शुक्रवारी (दि ९) पिंजरा लावला होता.
औरंगपूर येथे बिबट्या जेरबंद
ठळक मुद्दे वनविभागाने लावलेल्या पिंजºयात बिबट्या जेरबंद