शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

इंदिरानगरात बिबट्या

By admin | Updated: June 30, 2014 01:10 IST

इंदिरानगरात बिबट्या

 

इंदिरानगर : आज सकाळपासून इंदिरानगरात तीनदा बिबट्याचे दर्शन घडल्याने परिसरात घबराट पसरली आहे. रात्री १० वाजेच्या सुमारास शास्त्रीनगर येथील प्रथमेश बंगल्याजवळ पुन्हा बिबट्या आढळून आल्याने नागरिक भयभीत झाले आहेत. दरम्यान, परिसरातच बिबट्याने आश्रय घेतल्यामुळे नागरिकांची झोप उडाली. आज सकाळपासून तीन वेगवेगळ्या ठिकाणी बिबट्याचे दर्शन घडल्याने बिबट्याच्या वास्तव्याने नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे. घटनास्थळी वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी भेट देऊन पाहाणी केली असता त्यांना बिबट्याच्या वास्तव्याच्या कोणत्याही खुणा आढळून आल्या नाहीत. मात्र नागरिकांमधील घबराट कायम आहे. शनिवारी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास व रविवारी सकाळी सात वाजेच्या सुमारास अनेकांना बिबट्याचे दर्शन घडले होते. रात्री दहा वाजता परिसरात बिबट्या असल्याची चर्चा पसरल्यानंतर सकाळी पुन्हा सात वाजेच्या सुमारास अनेकांना कमोदनगर जवळील पटांगणात बिबट्या पळताना आढळून आला. परिसरात बिबट्याचा शिरकाव झाल्याची वार्ता पसरताच सकाळी नागरिकांनी प्रथमेश बगल्याभोवती बिबट्या पाहण्यासाठी गर्दी केली होती. वनविभागाचे वनक्षेत्रपाल राजन गायकवाड, वनपाल एम. एस. गोसावी व कर्मचाऱ्यांनी परिसरात येऊन पाहणी केली. पोलिसांसह कर्मचाऱ्यांनी शास्त्रीनगर परिसरात बिबट्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. सकाळी दहा वाजेपर्यंत हा सारा प्रकार सुरू असल्याने बघ्यांची गर्दी वाढत होती. काही वेळानंतर वनविभाग कर्मचाऱ्यांनी पोलिसांच्या साथीने परिसरात पाहणी केली असता त्यांना कुठेही बिबट्याचे ठसे आढळून आले नाहीत. त्यामुळे परिसरात खरोखरीच बिबट्या आला होता की निव्वळ अफवा होती, अशी चर्चा परिसरात सुरू असतानाच रात्री दहा वाजेच्या सुमारास त्याच बंगल्याच्या शेजारी बिबट्याचे पुन्हा दर्शन घडले. यामुळे बिबट्या सकाळपासून याच बंद असलेल्या बंगल्याच्या परिसरात दडून बसलेला असावा व रात्र होताच बिबट्याने पुन्हा दर्शन दिल्याने नागरिकांची झोप उडाली. वनविभागाचे अधिकारी बिबट्यावर नजर ठेवून असले तरी रात्रीच्या अंधारात बिबट्या दडून बसल्याने इंदिरानगरवासीयांची चिंता वाढली आहे. (वार्ताहर)