शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

चाडेगाव शिवारात बिबट्याची मादी जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2019 01:19 IST

परिसरातील महापालिका हद्दीतील चाडेगाव शिवारात शनिवारी (दि.२०) रात्रीच्या सुमारास चार वर्षे वयाची बिबट्याची मादी पिंजऱ्यात जेरबंद झाली. गेल्याच आठवड्यात याच शिवारात नर जातीचा बिबट्या पिंजºयात जेरबंद झाला होता.

एकलहरे : परिसरातील महापालिका हद्दीतील चाडेगाव शिवारात शनिवारी (दि.२०) रात्रीच्या सुमारास चार वर्षे वयाची बिबट्याची मादी पिंजऱ्यात जेरबंद झाली. गेल्याच आठवड्यात याच शिवारात नर जातीचा बिबट्या पिंजºयात जेरबंद झाला होता. या परिसरात अजून काही बिबटे असण्याची शक्यता गावकऱ्यांनी वर्तविली आहे.गेल्या चार दिवसांपूर्वी चाडेगाव बसस्थानकाच्या बाजूला नागरिकांना बिबट्याचा दर्शन झाले होते. शनिवारी रात्री उशिरा बिबट्याची मादी पिंजºयात बंदिस्त झाल्याचे रविवारी (दि.२१) सकाळी नागरिकांच्या लक्षात आल्यावर वनविभागाला कळविण्यात आले. वनपरिक्षेत्र अधिकारी रवींद्र भोगे, वनपरिमंडळ अधिकारी मधुकर गोसावी, वनरक्षक गोविंद पंढरे व सहकाºयांनी रेस्क्यू करून बिबट वन्यप्राण्यास ताब्यात घेतले. यावेळी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती.गेल्या काही महिन्यांपासून सामनगाव, कोटमगाव, हिंगणवेढे, एकलहरे, चाडेगाव परिसर बिबट्याच्या दहशतीखाली वावरत आहे. चाडेगाव, सामनगावरोड परिसरात बिबट्या पिंजºयात जेरबंद झाला. या घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी बिबट्याला पाहाण्यासाठी मोठी गर्दी केली होती.दरम्यान, एकलहरे गावाकडून मातोश्री कॉलेज व हिंगणवेढ्याकडे जाणाºया रस्त्यावर गेल्या पाच-सहा दिवसांपूर्वी रात्री आठ वाजेच्या सुमारास साहेबराव खर्जुल, एकनाथ पवळे, अरु ण खर्जुल, संभाजी पवळे, भूषण खर्जुल, शुभम पवळे, वामनराव पवळे, बाळासाहेब कासार, चेतन पवळे यांना रात्री आठ वाजता बिबट्या आढळला. साहेबराव खर्जुल यांच्या उसातून अचानक बिबट्याने झेप घेऊन घरासमोरील पाळीव कुत्र्यावर हल्ला केला.लोकांनी आरडाओरड केल्याने बिबट्याने तेथून पलायन करून समोरच्या उसात शिरला. या रस्त्यावर अंधाराचे साम्राज्य असल्याने नागरिकांत भीती वातावरण आहे. येथे पिंजरा लावावा, अशी शेतकºयांची मागणी आहे.हिंगणवेढ्यातही वास्तव्यहिंगणवेढ्यात प्रकाश धात्रक यांच्या शेतात गेल्या महिन्यात बिबट्याने धुमाकूळ घालून चार कुत्र्यांचा फडशा पाडला होता. तेथे पिंजरा लावण्यात आला आहे, मात्र बिबट्या हुलकावणी देत आहे. यापूर्वी पिंजºयात अडकलेला बिबट्या वनविभागाने सुरक्षित ठिकाणी सोडून दिल्यावर तोच पुन्हा या भागात आला असावा, अशी चर्चा आहे.

टॅग्स :leopardबिबट्याforest departmentवनविभाग