शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

वरखेड्यात बिबट्याचा मुक्त संचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2018 18:21 IST

वरखेडा येथे बिबट्याने पुन्हा दर्शन दिल्याने परिसरात दहशत पसरली असून, तत्काळ पिंजरा लावून बिबट्यास जेरबंद करण्यात यावे अशी मागणी करण्यात येत आहे.

ठळक मुद्देदिंडोरी तालुक्यातील कादवा, कोलवण नदीकाठी असलेल्या परिसरातील गावांना गेल्या बिबट्यांच्या दहशतीखाली वावरावे लागत आहे. सार्थकसह आजपर्यंत तीन बालकांचा या बिबट्यांनी जीव घेतला आहे. तर अनेकांची वासरे, कुत्रे आदी पाळीव प्राणी बिबट्याने फस्त केले आहेत.

वरखेडा : दिंडोरी तालुक्यातील परमोरी, वरखेडा, लखमापूर, पिंपळगाव केतकी, चिंचखेड परिसरात बिबट्याचा मुक्त संचार वाढला आहे. दोन दिवसांपूर्वी बिबट्याच्या हल्ल्यात तीन वर्षीय बालकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. त्याच रात्री साडेअकराच्या सुमारास वरखेडा येथे बिबट्याने पुन्हा दर्शन दिल्याने परिसरात दहशत पसरली असून, तत्काळ पिंजरा लावून बिबट्यास जेरबंद करण्यात यावे अशी मागणी करण्यात येत आहे.कादवा कोलवण नदीकाठच्या गावात बिबट्याचा मुक्त संचार सुरू आहे. पिंजरे लावले असतानाही बिबटे हल्ले करीत असल्याने, शेतकरी वर्ग, शालेय विद्यार्थी धास्तावले आहेत. तालुक्यातील नागरिक सातत्याने बिबट्याच्या बंदोबस्ताची मागणी करत आहे.यापूर्वी बिबट्याच्या हल्ल्यात म्हेळुस्केत श्रीरंग हर्षवर्धन खिरकाडे व लखमापूर येथील विवेक बिंद या बालकाचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला होता. तर परमोरी येथील शेतकरी ज्ञानेश्वर दिघे यांचा सार्थकही बिबट्याच्या हल्ल्यात बळी गेला. आणखी किती बालकांचे बळी घेणार? असा संतप्त सवाल नागरिकांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना केला आहे. (06 बिबट्या)