शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
3
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
4
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
5
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
6
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
7
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
8
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
9
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
10
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
11
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
12
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
13
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
14
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
15
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
16
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
17
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
18
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
19
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO: नाशकात बिबट्याला पकडण्याचा थरार सुरू; बिबट्याच्या हल्ल्यात वन क्षेत्रपाल जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2021 11:27 IST

नरसिंह नगर भागात शिरला बिबट्या; वनखात्याकडून बिबट्याला जेरबंद करण्याचे प्रयत्न सुरू

नाशिक- शहरातील नरसिंह नगर येथे नागरी वस्तीत आज सकाळी बिबट्या शिरल्याने धावपळ उडाली आहे वन खात्याचे कर्मचारी बिबट्याला जेरबंद करण्यासाठी घटनास्थळी आले असले तरी बिबट्या च्या मागे त्यांची धावपळ सुरू आहे. बिबट्याला पकडण्याच्या प्रयत्नात वन क्षेत्रपाल विवेक भदाणे यांना बिबट्याने पंजा मारल्याने ते किरकोळ जखमी झाले आहेत. त्यांनी बिबट्याला इंजेक्शन देण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यात त्यांना अपयश आले.दरम्यान, अक्षरधाम  सोसायटीच्या दुसऱ्या मजल्यावर सध्या बिबट्या असून त्याला इंजेक्शन देऊन बेशुद्ध करण्यातसाठी वनखात्याची कसरत सुरू आहे.नाशिक शहरातील नरसिंह नगर - आनंदवली भागात यापूर्वीसुद्धा दोन ते तीन वेळेस बिबट्याचे दर्शन झाले होते. आला होता आज सकाळी अनेक नागरिकांना मॉर्निंग वॉकला जाताना खासदार भारती पवार यांच्या घराजवळ बिबट्या आढळला त्यामुळे पोलिसांनी वनखात्याला कळविण्यात आले . ही माहिती कळताच घटनास्थळी नागरिकांची  प्रचंड गर्दी झाली. वनखात्याचे कर्मचारी आणि पोलिस हे बिबट्याला पकडून असताना नागरिकांच्या गर्दीमुळे त्याला पकडण्यात अडचणी येत होत्या दरम्यान सध्या अक्षर धाम या सोसायटीच्या दुसऱ्या मजल्यावर बिबट्या असल्याचे वन कर्मचाऱ्यांनी सांगितले या बिबट्याला बेशुद्ध करण्यासाठी वन खात्याचे कर्मचारी इंजेक्शन देण्याचा प्रयत्न करीत आहे तथापि अद्यापही यश आले नाही घटनास्थळी प्रचंड गर्दी असल्यामुळे नागरिकांनी गर्दी करू नये असे आवाहन वनखात्याच्या वतीने करण्यात आले आहे.

टॅग्स :leopardबिबट्या