शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

शहा येथे बिबट्या जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2021 04:14 IST

सिन्नर : तालुक्यातील शहा येथे वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात बिबट्या जेरबंद झाल्याची घटना गुरुवारी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास घडली. (दि. ...

सिन्नर : तालुक्यातील शहा येथे वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात बिबट्या जेरबंद झाल्याची घटना गुरुवारी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास घडली. (दि. २१) पहाटे उघडकीस आली. नर बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद झाला असला, तरी त्याच्यासोबत असलेली मादी व बछड्याचा मुक्तसंचार सुरू असल्याने शेतकऱ्यांमध्ये दहशत कायम आहे.

गेल्या चार दिवसांपासून शहा शिवारात बिबट्याच्या जोडीचे बछड्यासह दर्शन होत होते. बुधवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास सोनवणे मळ्यातील रामा सोनवणे हे मळ्यातून गावात दूध घालण्यासाठी येत असताना बिबट्याने दुचाकीचा पाठलाग केला होता. रामा सोनवणे यांनी जवळील वस्तीवर सहारा घेतल्याने बिबट्या माघारी गेला होता. या घटनेची माहिती सरपंच शुभांगी जाधव व त्यांचे पती सामाजिक कार्यकर्ते संभाजी जाधव यांना देण्यात आल्यानंतर त्यांनी तातडीने वनविभागासोबत संपर्क साधून या भागात पिंजरा लावण्याची मागणी केली होती.

त्यानंतर गुरुवारी सकाळी शहा-कोळगाव रस्त्यावर सोनवणे मळ्यातील ज्ञानेश्वर सोपान राहाणे यांच्या शेतात पिंजरा लावला होता. या पिंजऱ्यात कोंबड्या टाकण्यात आल्या होत्या. गुरुवारी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास नर बिबट्या या पिंजऱ्यात अलगद अडकला. त्यानंतर मादी व बछड्या या भागात संचार करीत होते. घटनेची माहिती वनविभागाला दिल्यानंतर सिन्नरचे वनपरिक्षेत्र अधिकारी प्रवीण सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल प्रीतेश सरोदे, वनरक्षक के.आर. इरकर, वनसेवक नारायण वैद्य, मधुकर शिंदे यांनी घटनास्थळी येऊन रात्री ११ वाजता बिबट्याची मोहदरी वनउद्यानात रवानगी केली होती.

---------------------------

शहा -कोळगाव रस्त्यावर सोनवणे मळ्यात नर बिबट्या जेरबंद झाला असला तरी मादी व बछड्याचा मुक्तसंचार सुरू आहे. त्यामुळे या भागातील शेतकरी कामावर जाण्यास धजावत नसल्याचे चित्र आहे. वनविभागाने या परिसरात पुन्हा पिंजरा लावून मादी व बछडा जेरबंद करण्याची मागणी नवनाथ सोनवणे, संभाजी जाधव यांच्यासह शेतक-यांनी केली आहे.

----------------------

सिन्नर तालुक्यातील शहा येथे वनविभागाच्या पिंजऱ्यात जेरबंद झालेला बिबट्या. (२१ सिन्नर १)

===Photopath===

210521\21nsk_22_21052021_13.jpg

===Caption===

२१ सिन्नर १