शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

धारणगाव वीर येथे बिबट्या जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2021 18:10 IST

खेडलेझुंगे : खेडलेझुंगे, कोळगांव, सारोळे थडी, धारणगाव परिसरामध्ये बिबट्यांचा वावर आहे. दरम्यान, मंगळवारी परिसरात वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात बुधवारी सकाळी एक बिबट्या जेरबंद झाला. या भागात बिबट्यांचे वास्तव्य वाढले असून, नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणावर दहशतीचे वातावरण निर्माण झालेले आहे.

ठळक मुद्देवनखात्याला यश : परिसरात बिबट्यांची दहशत

खेडलेझुंगे : खेडलेझुंगे, कोळगांव, सारोळे थडी, धारणगाव परिसरामध्ये बिबट्यांचा वावर आहे. दरम्यान, मंगळवारी परिसरात वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात बुधवारी सकाळी एक बिबट्या जेरबंद झाला. या भागात बिबट्यांचे वास्तव्य वाढले असून, नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणावर दहशतीचे वातावरण निर्माण झालेले आहे.

येथील अनेक पाळीव प्राण्यांचा फडशा बिबट्याने पाडलेला आहे. सद्या सुरू असलेल्या ऊस तोडणीमुळे आणि अवकाळी व वातावरणातील सततच्या बदलामुळे बिबट्यांचे आश्रय घेणे अवघड होत चालले असल्यामुळे बिबट्यांनी त्यांचा मोर्चा गावांकडे वळविलेला आहे. परिसरामध्ये नेमक्या किती बिबट्यांचा वावर आहे ? हे सांगता येणार नाही. परंतु, परिसरामध्ये बिबट्यांचा वावर वाढला असल्याचे दिसुन येत आहे.गेल्या आठवडाभरापासून ह्या परिसरात बिबट्यांची दहशत वाढलेली आहे. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांच्या उपजीविकेवर, तसेच व्यवसायावर त्याचा परिणाम होत असून, सर्वत्र भीतीचे सावट पसरलेले आहे. त्यातच वीज वितरण कंपनीकडून शेतीसाठी रात्रीचा वीजपुरवठा होतो. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांना शेतीला पाणी देण्यासाठी रात्री-अपरात्री जावे लागते. त्यातच परिसरामध्ये बिबट्याचा वावर वाढल्याने शेतकऱ्यांच्या जिवावर बेतण्यासारखे आहे.या संदर्भात परिसरातील नागरिकांनी ओरड करताच वनखात्याने परिसरात मंगळवारी (दि. २३) पिंजरा लावला असता बुधवारी (दि. २४) सकाळी एक बिबट्या या पिंजऱ्यात अडकला.बिबट्याच्या दहशतीमुळे शेतकऱ्यांना पिकांना पाणी देणे अशक्य होत आहे. अजूनही परिसरामध्ये किती बिबटे आहेत याची माहिती नसल्याने नागरिकांमध्ये याविषयी चिंता व्यक्त केली जात आहे. तसेच वीजपुरठा दिवसाचा करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.पिंजऱ्यात अडकलेला बिबट्यास वन विभागाचे अधिकारी महाले व शेख ह्यांच्या मार्गदर्शनाखाली अमोल गंभीरे, राहुल गंभीरे, महेश गंभीरे, संजय गंभीरे, अजय गंभीरे, मन्सूर शेख, ॠषीकेश गंभीरे, स्वप्निल गंभीरे, आदी ग्रामस्थांच्या सहकार्याने वनविभागाकडे पाठविण्यात आले. (२४ खेडलझुंगे, १, २)

टॅग्स :forest departmentवनविभागleopardबिबट्या