सिन्नर/नायगाव : तालुक्यातील चिंचोली शिवारात गुरुवारी रात्री १०.३० वाजेच्या सुमारास बिबट्याला पकडण्यात वनविभागाला यश आले. गेल्या पाच दिवसांपासून बिबट्याला पकडण्यासाठी परिसरात पिंजरा लावण्यात आला होता.चिंचोली येथील महादू लहाणू सानप यांच्या शेत गटनंबर ३१ मध्ये गेल्या आठवड्यात बछडा आढळून आला होता. या भागात तीन ते चार बिबट्यांचे वास्तव्य असल्याचे सांगत शेतकऱ्यांनी पिंजरा लावण्याची मागणी केली होती. त्यानुसार सिन्नरचे वनपरिक्षेत्र अधिकारी प्रवीण सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली सानप यांच्या शेतात दि. २५ जुलैपासून शेळीसह पिंजरा ठेवण्यात आला होता. गुरुवारी रात्री भक्ष्याच्या शोधात आलेला पाच ते सहा वर्षे वयाचा पूर्ण वाढ झालेला नर बिबट्या या सापळ्यात अलगद अडकला. शुक्रवारी (दि. ३१) सकाळी वनकर्मचाºयांनी बिबट्यासह पिंजरा मोहदरी घाटातील वन उद्यानात हलवला. तेथे वैद्यकीय तपासणी केल्यानंतर वरिष्ठ कार्यालयाच्या निर्देशाने या बिबट्याची सुरक्षित स्थळी रवानगी करण्यात आली. परिसरात अद्यापही बछड्यांसह मादी बिबट्याचे वास्तव्य असावे, असे शेतकºयांचे म्हणणे आहे.
चिंचोली शिवारात बिबट्या पिंजºयात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2020 01:07 IST