शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
2
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
3
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
4
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
5
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
6
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
7
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
8
आयोग नव्हे, मतदारच राजा !
9
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
10
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
11
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
12
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
13
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
14
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
15
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
16
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
17
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
18
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
19
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
20
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई

भादवण परिसरात बिबट्याचा धुमाकूळ

By admin | Updated: September 8, 2015 23:21 IST

घबराट : शिंगरू केले फस्त; मेंढपाळांवर स्थलांतराची वेळ

पिळकोस : कळवण तालुक्यातील भादवण गाव व परिसरात बिबट्याने पुन्हा धुमाकूळ घालण्यास सुरुवात केली आहे. प्रवीण बाळासाहेब जाधव यांच्या पिळकोस-बगडू पुलाजवळील मळ्यातील त्यांच्या घराशेजारील वावरात मेंढपाळ तळ ठोकून होते. काल रात्री बिबट्याने अचानक हल्ला केल्याने मेंढ्यांसमवेत असलेल्या धनगर बांधवाचा थरकाप उडाला. बिबट्याच्या त्या हल्ल्यात मेंढपाळ मुक्का रावजी पवार (मुळाणे) यांच्या घोडीचे शिंगरू बिबट्याने मक्याच्या शेतात ओढून नेऊन फस्त केले. दोन मेंढ्या नदीकडे बिबट्याने ओढून नेल्या असल्याचे सांगण्यात येत आहे. बिबट्याच्या उपद्रवामुळे मेंढपाळांनी भादवण परिसरातून स्थलांतरित होण्यास सुरुवात केली असून, शेळीपालन करणाऱ्या आदिवासी बांधवांना पशुधनाच्या सुरक्षिततेसाठी रात्र जागून काढावी लागत आहे. परिसरातील बिबट्या जेरबंद करणे अत्यंत गरजेचे झाले असून, भीतीचे वातावरण पसरले आहे. वनरक्षक घुगे, वनपाल व्ही. बी. पाटील यांनी सकाळी कर्मचाऱ्यांसमवेत घटनास्थळी येऊन परिसराची पाहणी केली व पंचनामा केला. नागरिकांनी पिंजरा लावण्याचा आग्रह धरला असून, बिबट्याला लवकर जेरबंद करावे, अशी मागणी केली आहे. कळवण तालुक्यातील मोकभणगी, विसापूर, पांढरीपाडा, भादवण, पिळकोस, गांगवन, धनगरपाडा ही गावे चौरंगनाथ किल्ला व देवडोंगराच्या पायथ्याजवळील असून या गावांना बिबट्याचा उपद्रव सहन करावा लागतो. मागील वर्षी मोठाभाऊ सोनवणे या पशुपालन करणाऱ्या बांधवाच्या बारा शेळ्या बिबट्याने फस्त केल्या होत्या. त्याच्याजवळ आज एकही शेळी नसून त्याचा शेळीपालनाचा व्यवसाय तेव्हापासून खंडित झाला. या परिसरात जंगलात सर्वाधिक मोर, ससे, पोपट, माकडे, कोल्हे, लांडगे व आता बिबटे व मादीचे वास्तव्य वाढले आहे. मोर, ससे, पोपट, माकडे यांनी जरी जंगलाच्या सौंदर्यात वाढ झाली असली तरी, ज्या शेतकऱ्यांनी जंगलाचे रक्षण केले आज त्याच शेतकऱ्यांना या घनदाट जंगलाची भीती वाटू लागली आहे. बिबट्याच्या दहशतीतून कायमस्वरुपी मुक्त करण्याची आज वेळ आली आहे. आज ग्रामीण भागातील सत्तर टक्के शेतकरी आता शेतात वास्तव्य करत असून, शेत परिसरात बिबट्याच्या वावरण्याने शिवारातील शेतकऱ्यांनाही सतत बिबट्याची धडकी भरलेली असल्याचे शेतकऱ्यांनी यावेळी सांगितले. तसेच बिबट्याकडून पशुधनाचे जे काही नुकसान होते त्याचा योग्य मोबदला मिळत नसून शेतकऱ्यांनी पशुधन सांभाळावे की नाही याचा विचार शेतकरी व पशुपालकांना पडत आहे. कळवण वनविभागाने गांगवन परिसराला बिबट्याच्या जाचातून लवकरात लवकर मुक्त करावे, अशी मागणी ग्रामस्थ, पशुपालक, शेतमजूर यांनी केली आहे. कळवण तालुक्यात जंगल वाढत असल्याकारणाने एकाच डोंगर रांगेतील गावात वावरणाऱ्या सर्वाधिक बिबट्यांना पकडणे वनविभागापुढे मोठे आव्हान असून परिसरात एवढ्या मोठ्या प्रमाणावर बिबटे येतात तरी कुठून? कोण सोडतात हे बिबटे असा ग्रामस्थ व पशुपालकांचा प्रश्न आहे. बिबट्यांमुळे विसापूर बिटात सात वर्षांत ७० शेळ्या, शेकडो कोंबडे, ४० वासरे तर फिरस्तीवर असणाऱ्या मेंढपाळांचे किती पशुधन मृत झाले याचा अंदाज नाही. पिळकोस, भादवण, विसापूर, गांगवन, पांढरीपाडा हा परिसर बिबट्याच्या दहशतीतून भयमुक्त करावा, अन्यथा परिस्थिती अशीच राहिल्यास परिसरातील पशुधन लवकरच नष्ट होईल, असे पशुपालकांनी सांगितले. (वार्ताहर)