शहरं
Join us  
Trending Stories
1
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
2
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
3
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
4
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
5
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
6
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
7
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
8
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
9
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
10
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
11
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
12
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
13
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
14
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
15
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
16
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...
17
"परेश रावल यांच्याशिवाय...", 'हेरा फेरी ३'च्या वादावर सोनाक्षी सिन्हा म्हणाली असं काही...
18
इंदिरा गांधींचा निर्णय संविधानिक, ११ वर्षांपासून सुरू असलेल्या अघोषित आणीबाणीचे काय?: सपकाळ
19
इराणचा अणुबॉम्बबाबत मोठा निर्णय; अणुनिरीक्षण संस्थेशी संबंध तोडणार!
20
ना रोहित-विराटसारखी धमक; ना सिनियर्ससमोर बोलण्याचं धाडस! गिलच्या कॅप्टन्सीवर दिग्गजाचे मोठं वक्तव्य

टिंगरी येथील तरुणावर बिबट्याचा हल्ला

By admin | Updated: June 16, 2014 01:05 IST

बिबट्याने हल्ला केल्यामुळे गंभीर जखमी झाला आहे.

आसखेडा : टिंगरी (ता. बागलाण) येथील आदिवासी तरुण भरत धुडकू गायकवाड (३५) हा गावाशेजारी जंगल परिसरात बकऱ्या व मेंढ्या चारण्यासाठी गेला असता बिबट्याने हल्ला केल्यामुळे गंभीर जखमी झाला आहे.टिंगरी येथील रहिवासी भरत धुडकू गायकवाड हा मेंढ्या व बकऱ्या घेऊन नेहमीप्रमाणे जंगल परिसरात चारण्यासाठी गेला होता. सायंकाळी बकऱ्या घराकडे नेत असताना अचानक दबा धरून बसलेल्या बिबट्याने भरतवर हल्ला चढविला. भरतने आरडाओरड केल्यामुळे त्याचा साथीदार छोटू नानाजी गायकवाड हा धावून आला व त्याने बिबट्यापासून भरतची सुटका केली. त्याच क्षणात बिबट्याने धूम ठोकली. गंभीर स्वरूपाची जखम झाल्यामुळे भरत यास खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र भरतला अस्वस्थ जाणवू लागल्याने नामपूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, वनपाल विनय देवरे यांना भ्रमणध्वनीद्वारे सविस्तर माहिती कळवूनदेखील त्यांनी कुठल्याही प्रकारची दखल घेतली नसल्याचे भरत यांनी सांगितले. सद्या जंगलाची सर्रास तोड चालू आहे. मात्र सुस्त झालेला संबंधित विभाग मात्र दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे वन्यप्राणी मोकाट फिरत आहेत, असे गावकऱ्याचे म्हणणे आहे. (वार्ताहर)