शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

बिबट्याचा वासरावर हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2020 15:46 IST

नांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्यात मानवी व प्राणी यांच्यावर बिबट्याच्या हल्ल्यांचा धुमाकूळ सुरूच असून पिंपळगाव मोर, अधरवड, अडसरे बुद्रुक येथील बिबट्याने केलेल्या हल्ल्याच्या घटना ताज्या असतांनाच इगतपुरी तालुक्यातील पाडळी देशमुख येथील रघुनाथ वारुंगसे या शेतकऱ्याच्या पडवीत घुसून गायीच्या वासरावर हल्ला चढवत त्यांना जखमी केले.

ठळक मुद्देनांदूरवैद्य : पाडळी देशमुख येथे महिन्यातील दुसरी घटना

नांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्यात मानवी व प्राणी यांच्यावर बिबट्याच्या हल्ल्यांचा धुमाकूळ सुरूच असून पिंपळगाव मोर, अधरवड, अडसरे बुद्रुक येथील बिबट्याने केलेल्या हल्ल्याच्या घटना ताज्या असतांनाच इगतपुरी तालुक्यातील पाडळी देशमुख येथील रघुनाथ वारुंगसे या शेतकऱ्याच्या पडवीत घुसून गायीच्या वासरावर हल्ला चढवत त्यांना जखमी केले.इगतपुरी तालुक्यातील पाडळी देशमुख येथे शनिवारी (दि.२६) रात्रीच्या सुमारास शेतकरी रघुनाथ वारुंगसे हे झोपलेले असतांना शेजारीच त्यांची जनावरांच्या निवारासाठी असलेल्या पडवीत इतर जनावरांच्या सोबत दोन तीन वासरे असून यावेळी भक्ष शोधण्यासाठी आलेल्या बिबट्याने पडवीत घुसून वासराला फरफटत घेऊन जात असतांनाच या ठिकाणी असलेल्या शेतकऱ्यांनी पाहिले. या बिबट्याला पळविण्यासाठी अखेर फटाके वाजवत तसेच आरडाओरडा करत बिबट्याच्या तावडीतून वासराची सुटका केली.याआधी काही दिवसांपूर्वीच याच ठिकाणी राहत असलेल्या बाबुराव गोंडके या शेतकऱ्याच्या श्वानावर बिबट्याने हल्ला चढवत त्याला ठार केले होते. या ठिकाणी अजून एक बिबट्या असून शेजारीच असलेले शेतकरी पंडीत धांडे यांच्या निदर्शनास आल्याचे यावेळी माहिती देतांना सांगितले. यामुळे या एकाच ठिकाणी दोन वेगवेगळे बिबटे असल्याची खात्रीलायक माहिती प्रत्यक्षदर्शी शेतकऱ्यांनी सांगितले.यामुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून बिबट्याच्या या दहशतीमुळे शेतकरी रात्रीपिकांना पाणी देण्यासाठी बाहेर पडण्यास घाबरत आहेत. बिबट्याच्या या वाढत्या हल्ल्यांपासून वाचविण्यासाठी या ठिकाणी वनविभागाच्या वतीने पिंजरा लावण्यात यावा अशी मागणी पंडीत धांडे, रघुनाथ वारुंगसे, ॠषिकेश धांडे, प्रल्हाद धांडे, संदिप वारूंगसे, बाबुराव गोंडके, आदींसह परिसरातील शेतकरी करीत आहेत.बिबट्याच्या वाढत्या हल्ल्यांमुळे परिसरातील शेतकरी पिकांना पाणी देण्यासाठी बाहेर पडण्यास घाबरत आहेत. या एकाच ठिकाणी महिन्याभरातच बिबट्याने दुसऱ्यांदा हल्ला केला असून वनविभाग याकडे गांभीर्याने लक्ष देत नसल्याने भविष्यात सदर हल्लेखोर बिबट्या मानवावर हल्ला करु शकतो. तरी वनविभागाने याकडे गांभीर्याने लक्ष देवून या परीसरात पिंजरा लावून बिबट्यास जेरबंद करण्यात यावे.- पंडित धांडे, शेतकरी, पाडळी देशमुख.

(२७ नांदूरवैद्य)पाडळी देशमुख येथे बिबट्याने केलेल्या हल्ल्यात जखमी झालेले वासरू.

टॅग्स :forest departmentवनविभागleopardबिबट्या