शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

आमदार निधीतील वास्तूंचा  ताबा सामाजिक संस्थांकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2018 00:28 IST

आमदार स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत उभारण्यात येणाऱ्या समाजमंदिर, सामाजिक सभागृह, बालवाडी, अंगणवाडी, व्यायामशाळा या वास्तूंची देखभाल-दुरुस्ती करण्यास महापालिकेने असमर्थता दर्शविल्यास सदर वास्तूंची मालकी शासनाकडेच ठेवून त्या नोंदणीकृत सामाजिक/विश्वस्त संस्थांकडे सोपविण्याचे परिपत्रक शासनाच्या नियोजन विभागाने काढले आहे. या निर्णयामुळे शहरातील आमदार विकास निधीतून उभ्या राहिलेल्या वास्तूंबाबत महापालिका नेमकी काय भूमिका घेते, याकडे लक्ष लागून असणार आहे.

नाशिक : आमदार स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत उभारण्यात येणाऱ्या समाजमंदिर, सामाजिक सभागृह, बालवाडी, अंगणवाडी, व्यायामशाळा या वास्तूंची देखभाल-दुरुस्ती करण्यास महापालिकेने असमर्थता दर्शविल्यास सदर वास्तूंची मालकी शासनाकडेच ठेवून त्या नोंदणीकृत सामाजिक/विश्वस्त संस्थांकडे सोपविण्याचे परिपत्रक शासनाच्या नियोजन विभागाने काढले आहे. या निर्णयामुळे शहरातील आमदार विकास निधीतून उभ्या राहिलेल्या वास्तूंबाबत महापालिका नेमकी काय भूमिका घेते, याकडे लक्ष लागून असणार आहे.शहरात महापालिकेच्या मालकीच्या असलेल्या ९०३ मिळकतींसंदर्भात आयुक्तांच्या आदेशान्वये संबंधितांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. सदर मिळकतींची सद्यस्थितीही त्या माध्यमातून जाणून घेतली जाणार आहे. शहरात महापालिकेच्या मोकळ्या भूखंडांवर आमदार स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत अनेक ठिकाणी समाजमंदिरांसह अंगणवाडी, व्यायामशाळांच्या इमारती उभ्या राहिल्या आहेत. सदर वास्तू आमदार निधीतून उभ्या राहिल्यानंतर त्या स्थानिक स्वराज्य संस्था म्हणून महापालिकेकडे हस्तांतरित केल्या जातात. त्या वास्तूंची मालकी महापालिकेकडे देऊन त्यांच्या देखभाल-दुरुस्तीचीही जबाबदारी सोपविली जाते. मात्र, बºयाचदा या वास्तूंची देखभाल-दुरुस्ती करण्यास महापालिकेकडून असमर्थता व्यक्त केली जाते. बºयाचदा अशा इमारती विनावापर पडून राहतात. त्यामुळे त्यांची दुरवस्था होते. शासनाच्या नियोजन विभागाने आता अशा वास्तूंबाबत धोरणच निश्चित केले असून, आमदार निधीतून उभ्या राहणाºया वास्तूंची देखभाल-दुरुस्ती करण्यास मनपाने असमर्थता दर्शविल्यास वास्तूंची मालकी शासनाकडेच ठेवून त्याची देखभाल व दुरुस्तीची जबाबदारी नोंदणीकृत सामाजिक/विश्वस्त संस्थांकडे सोपविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे महापालिकेच्या भूमिकेकडे आता लक्ष लागून असणार आहे.जिल्हाधिकायांना अधिकारसदर वास्तू या सामाजिक अथवा विश्वस्त संस्थांकडे सोपविण्याचे अधिकार जिल्हाधिकाºयांना प्रदान करण्यात आले आहेत. सदर वास्तूचे भाडेमूल्य शासनाने विहित केले नसल्यास ते ठरविण्यासाठी जिल्हाधिकाºयांच्या अध्यक्षतेखालील कार्यकारी समिती निर्णय घेणार आहे. या समितीत महापालिकेतील संबंधित खात्यातील अधिकाºयांचाही समावेश असणार आहे. या वास्तूंची स्वतंत्र नोंदवही ठेवली जाणार असून, परवानगी नसलेल्या कामांकरिता वापर होत असल्यास त्याबाबतचे निरीक्षण वर्षातून एकदा करण्याचेही निर्देश परिपत्रकात आहेत.