शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

ग्राहकांची लूट करणाऱ्यांना कायदेशीर सवलत

By admin | Updated: August 5, 2015 00:10 IST

ग्राहकांची लूट करणाऱ्यांना कायदेशीर सवलत

नाशिक : १ आॅगस्टपासून महापालिका हद्दीतील एलबीटी म्हणजेच स्थानिक संस्था कर रद्द करण्यात आल्याने तो कर वगळून ग्राहकांना विकल्या जात नाही तर एलबीटीसहीत दर आकारून लूट सुरू आहे. तथापि, यावर शासकीय यंत्रणांचे मौन आहे. तर कंपन्यांनी अधिकृतरीत्या किमान मूल्य कमी केल्याचे जाहीर करीत नाही तोपर्यंत कारवाई करता येत नाही असे वैधमापन विभागाचे म्हणणे असून, ग्राहक संघटनांनी ग्राहकांच्या बाजूने उभे राहून लढण्याऐवजी नागरिकांनाच तक्रार करण्याचे आवाहन केले आहे.जकात रद्द झाल्यानंतर राज्यशासनाने त्याला पर्याय म्हणून एलबीटी लागू केला. त्यातून पाच लाख रुपयांपर्यंतची उलाढाल असलेले छोटे व्यावसायिक विक्रेते वगळले. मात्र, अन्य व्यापारी आणि उद्योजकांना मात्र ती कायम होती आता १ आॅगस्टपासून ५० कोटी रुपयांपेक्षा कमी उलाढाल असणाऱ्यांना एलबीटीच्या कक्षेतून वगळण्यात आले आहे. त्यामुळे ९९ टक्केव्यापारी - उद्योजक एलबीटीच्या कचाट्यातून सुटले आहेत. नाशिक पुरताच विचार करायचा तर शहरात फक्त ९२ आस्थापनांनाच कर लागू होणार आहे. साहजिकच कोणत्याही वस्तूवर असलेला दोन ते चार टक्के कराचा विचार करता हा कर वगळून वस्तूची विक्री व्हायला हवी. मात्र एलबीटी रद्द होऊन तीन दिवस झाले तरी अद्याप कोणीही त्यानुसार कार्यवाही करण्यास तयार नाही. नागरिकांना कोणतीही वस्तू स्वस्तात मिळत नाही उलट कर रद्द झाला असतानाही करासहित वस्तू विकल्या जात असल्याने नागरिकांकडून बेकायदा लूट सुरू आहे.यासंदर्भात वजन मापे विभागाच्या अधिकाऱ्यांनी असमर्थता दर्शविली. ज्या कंपन्यांनी मालावर कमाल किंमत मुद्रित केली आहे. त्यापेक्षा कमी किमतीत विक्री करा, असे विक्रेत्यांना सांगता येणार नाही, असे सांगून लूट करणाऱ्यांना कायदेशीर सवलतच जणू दिली आहे. एलबीटी रद्द झाल्यांनतर संबंधित वस्तूच्या उत्पादक कंपनीने तसे दोन वृत्तपत्रांत जाहिरात देऊन सुधारित किंमत जाहीर करून त्याच दराने वस्तू विकत घेण्याचे आवाहन केले पाहिजे तरच त्यानुसार दर आकारणी न करणाऱ्या विक्रेत्यांवर कारवाई करता येईल. तर दुसरीकडे ग्राहक संघटनांनी अशा विक्रेत्यांवर कारवाई करणे सोडून नागरिकांनीच तक्रार करावी, असे आवाहन केले आहे. (प्रतिनिधी)