नाशिक : ओम काउन्सेलिंग सेंटर व फडोळ असोसिएट्स यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी (दि. ७) सायं. ६ वाजता रावसाहेब थोरात सभागृहात ‘वास्तुशास्त्र-एक वैज्ञानिक दृष्टिकोन’ या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. यावेळी डॉ. निर्मल शाह हे स्लाइड शोद्वारे मार्गदर्शन करणार आहेत. यावेळी आपल्या वास्तूत असलेले दोष कोणत्याही प्रकारची तोडफोड न करता कसे दूर करावेत, याविषयी मार्गदर्शन करण्यात येणार आहे. व्याख्यानास उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
वास्तुशास्त्र विषयावर आज व्याख्यान
By admin | Updated: May 7, 2016 00:02 IST